मुळा धरण रस्त्याचे भाग्य उजळणार : आ. प्राजक्त तनपुरे | पुढारी

मुळा धरण रस्त्याचे भाग्य उजळणार : आ. प्राजक्त तनपुरे

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : मुळा धरणाकडे जाणार्‍या रस्त्यासाठी सुमारे 5 कोटी 76 लाख 2 हजारांचा निधी मंजुर झाल्याने या रस्त्याची साडेसाती संपुष्टात येणार आहे. राहुरी मतदार संघातील नगर- मनमाड रस्ता ते मुळा धरण या 8 कि. मी. रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 4 कोटी 74 लाख 12 हजार तर मुळा धरण गेट ते मुळा धरण भिंतीपर्यंत 3 कि. मी. रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 1 कोटी 98 लाख 47 हजार असा एकुण 5 कोटी 76 लाखांचा निधी मंजुर झाल्याची माहिती आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

आ. तनपुरे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुळा धरण रस्ता करण्यासाठी वेळोवेळी बैठका घेऊन निधी मंजुर केला होता. हा रस्ता पर्यटकांनी नेहमी वर्दळीचा असल्याने अनेक वर्षांपासुन वाहतुकीस खराब झाला होता. या रस्त्यावरुन वरवंडी, मुळानगर व परिसरातील काही लोकांचा प्रवास जीवघेणा झाला होता. मुळा धरण येथे पुरनियंत्रण कक्ष असल्याने पावसाळ्यात व्यवस्थापणासाठी धरणावर येणे- जाण्यास रस्ता महत्वाचा आहे. आ. तनपुरे यांच्या प्रयत्नांतुन या रस्त्यासाठी कोट्यवधीचा निधी मिळाल्याने परिसरातील जनतेने समाधान व्यक्त केले. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दैना कधी फिटणार, याची नागरिक आतुरतेने वाट पहात होते.

आ. तनपुरेंचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला!
राहुरी मतदार संघातील रस्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी
म्हणून शासनाकडे सक्षम भूमिका मांडत निधी मिळवत राहू, असे प्रतिपादन आ. प्राजक्त तनपुरे यांनी केले.

Back to top button