उत्तर महाराष्ट्र

जळगाव : भुसावळमधील 32 उपद्रवींच्या बंदोबस्ताची तयारी ; शहरबंदीचे प्रस्ताव सादर

गणेश सोनवणे

जळगाव पुढारी वृत्तसेवा : भुसावळ तालुक्यातील ३२ उपद्रवींच्या शहरबंदीचे प्रस्ताव पोलीस प्रशासनाने सादर केले असून यावर प्रांताधिकारी लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.

आगामी काळातील सण-उत्सव पाहता भुसावळ शहर, तालुका आणि बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ३२ उपद्रवींच्या शहरबंदीचे प्रस्ताव पोलिस प्रशासनाने प्रांताधिकार्‍यांकडे पाठवले आहेत. प्रत्येक पोलिस स्थानकांनी तयार केलेले या प्रस्तावांची डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी अंतिम तपासणी केली. यानंतर संबंधित प्रस्ताव प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.

शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६, बाजारपेठच्या हद्दीत ११ व नशिराबाद हद्दीतील पाच असे हे प्रस्ताव आहेत. प्रस्तावात उल्लेख असलेल्यांवर विविध गुन्हे असून त्यांना या ९ ते १७ एप्रिल या काळात शहरात येण्यास मनाई करावी, असे नमूद केले आहे. या प्रस्तावावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. भुसावळ पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी उपद्रवींवर हद्दपारी, एमपीडीए आदींसारख्या कारवाईंचा सपाटा लावला आहे. यानंतर आता गुन्हेगारांना शहरबंदीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT