उत्तर महाराष्ट्र

आयटीआय’ची पहिली यादी २० जुलैला, प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयच्या सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले. त्यानुसार सोमवार (दि. १२) पासून प्रारंभ झाला. दि. ११ जुलैपर्यंत इच्छुक विद्यार्थ्यांना https://admission.dvet.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे. दि. १६ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी, तर दि. २० जुलैला पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश निश्चिती करता येणार आहे.

आयटीआय प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक पात्रता असलेल्या १४ वर्षांवरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी पात्र असणार आहे. या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज, नोंदणी शुल्क भरणे, पसंतीच्या 'आयटीआय'ची निवड करणे, अर्जात दुरुस्ती व हरकती नोंदविण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरम्यान, यंदा राज्यातील ४१८ शासकीय आणि ५७४ अशासकीय संस्थांमधील १ लाख ५४ हजार ३९२ जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामध्ये शासकीय आयटीआयच्या ९५ हजार ३८० आणि खासगी आयटीआयच्या ५९ हजार १२ जागांचा समावेश आहे. आयटीआयमध्ये प्रवेशासाठी ८३ अभ्यासक्रम उपलब्ध असणार आहे. त्यात पारंपरिक लोकप्रिय व्यवसायिक अभ्यासक्रमासह एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर तसेच ड्रोन टेक्निशियन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या व्यवसायिक कोर्सचा समावेश आहे.

असे आहे वेळापत्रक

ऑनलाइन अर्ज : १२ जून ते ११ जुलै

पहिल्या फेरीसाठी संस्था पसंतीक्रम : १९ जून ते १२ जुलै

अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : १६ जुलै

पहिली प्रवेश फेरी : २० जुलै

द्वितीय प्रवेश फेरी : ३१ जुलै

दुसऱ्या यादी प्रवेश : १ ते ४ ऑगस्ट

तिसरी प्रवेश फेरी : ९ ऑगस्ट

चौथी प्रवेश फेरी : २० ऑगस्ट

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT