उत्तर महाराष्ट्र

जळगावातील पाच डॉक्टरांची सीबीआयतर्फे चौकशी ; एफएमजीई परीक्षा न देता सुरु केली वैद्यकीय सेवा 

गणेश सोनवणे

जळगाव : रशिया व इतर देशातून वैद्यकीय पदवी घेऊन राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेच्या नियमानुसार 'एफएमजीई' ही परीक्षा उत्तीर्ण न करता भारतात प्रॅक्ट्रीस करणाऱ्यांविरुध्द सीबीआयतर्फे छापे टाकून गुन्हे दाखल करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातही ही कारवाई झाली असून, शहरातील एका डॉक्टरचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

सन २०११-२२ या कालावधीत रशिया, युक्रेन, चीन व नायजेरिया या देशात एमबीबीएस करणाऱ्या डॉक्टरांची संख्या वाढली होती. या देशांत एमबीबीएस झालेल्या डॉक्टरांना भारतात प्रॅक्टीस करावयाची असल्यास त्यांना राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेची 'फॉरेन मेडिकल गॅज्युएट इंटरन्स' (एफएमजीई) ही परीक्षा पास होणे आवश्यक असते. मात्र परिक्षा न देता प्रॅक्टीस सुरु करणाऱ्या डॉक्टरांविरुध्द राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने (एनएमसी) याबाबत तीन महिन्यांपूर्वी सीबीआयकडे रितसर तक्रारही केली होती. त्यावरून देशभरात ९१ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. त्यातून ७३ डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. जळगाव शहरात या प्रकारचे पाच डॉक्टर कार्यरत आहेत. त्यांची सीबीआय पथकाने चौकशी केली. त्यापैकी एका डॉक्टरविरुध्द सीबीआयने गुन्हा दाखल केला असून त्याला दिल्ली येथे चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT