उत्तर महाराष्ट्र

नाशिक : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत मृत शेतकर्‍यांच्या वारसांना 98 लाखांची मदत

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यात गेल्या वर्षी 49 मृत शेतकर्‍यांच्या वारसांना 98 लाखांची मदत देण्यात आली. मदत मंजूर केलेल्या प्रकरणांत सर्वाधिक मृत्यूची नोंद ही रस्ते अपघातामधील असून, सर्पदंश किंवा जनावरांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे.

राज्यात 2010 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना व त्यांच्या वारसांना मदत केली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतीत होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्प व विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात व अन्य कोणत्याही कारणाने शेतकर्‍यांचा मृत्यू ओढावल्यास किंवा अपंगत्व असल्यास त्यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येते. त्यामध्ये शेतकर्‍याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना दोन लाख रुपये व अपंगत्व आल्यास एक लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते.
जिल्ह्यामधून गेल्या वर्षभरात अपघात विमा योजनेच्या लाभासाठी कृषी विभागाकडे विविध स्वरूपाची एकूण 124 प्रकरणे दाखल झाली होती. यामध्ये आजपर्यंत 49 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. तर काही प्रकरणांत कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांना मदत देण्यात आलेली नाही. तसेच 28 प्रकरणांत केवळ माहिती मिळाली असून, 1 प्रकरण अद्याप प्रक्रियेत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT