उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये रंगणार गझलोत्सव

गणेश सोनवणे

नाशिक : अखिल भारतीय साहित्य संमेलनात श्रोत्यांची वाहवा मिळविल्यानंतर नाशिकमध्ये प्रथमच 'गझलोत्सव' अर्थात महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी व गझलकरांची मैफल नाशिककरांना अनुभवायला मिळणार आहे. रविवारी दि. 1 मे 2022 रोजी, कुसुमाग्रज स्मारक येथे संध्याकाळी ५.३० वाजता 'गझलोत्सव' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम समस्त नाशिककरांसाठी खुला असून यात उर्दुचे जेष्ठ गझलकार, नासिर शकेब यांच्यासह गोपाल मापारी (बुलढाणा), संजय शिंदे (मुंबई), निर्मिती कोलते (सांगली), याबरोबरच नाशिकचे संतोष वाटपाडे, अरूण सोनवणे, अनिता बोडके, आणि जयश्री वाघ असे महाराष्ट्रातील आठ नामवंत कवी, गझलकार सहभागी होणार आहेत. या मैफिलीचे सूत्रसंचालन आकाश कंकाळ हा युवा गझलकार करणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी विश्वास ठाकूर यांच्यासह शहरातील अनेक रसिक मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहे. नाशिककरांनी या काव्य मैफिलीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन 'गझलोत्सव' च्या आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT