जळगाव ; पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील विदगाव येथे एक तर भुसावळ तालुक्यातील वरणगाव ऑर्डन्स फॅक्टरी, वरणगाव फाटया जवळील उड्डानपुला खाली तीन अशा चार जणांकडून 5 गावठी, एक मॅगझीनसह 7 जिवंत काडतुस जप्त करण्यात आल्या आहेत. भुसावळ तालुक्यातील वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी बाहेरील पुलाजवळ गावठी कट्टे विक्रीला आल्याने फॅक्टरीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे, सहा. पोलीस अधीक्षक, कुमार चिता यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना सुचना दिली की, जळगाव जिल्हयांत काही इसम आपले कब्जात गावटी कट्ट बाळगुन आहेत. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, यांना गुप्त बातमीच्या आधारे तिन इसम हे आईन्स फैक्टरी, वरणगाव फाटया जवळील उद्यान पुलाजवळ गावटी कट्टे विक्रीसाठी येणार आहेत व दुसरी बातमी तालुक्यातील विदगाव येथे एक इसम वैष्णवी हॉटेल जवळ एक गावटी कट्टा असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सहा.पो.नि जालिर पळे, सहायक फौजदार अशोक आकार महाजन, पोहेकॉ महेश आत्मागम महाजन, ईश्वर पाटील, चापोहेकॉ विजय गिरधर चौधरी अशांचे पथक विदगाव येथे रवाना झाले.
दुसरे पो नि अमोल दबडे, सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ लक्ष्मण अरुण पाटील, पो ना किशोर ममराज गटोड, पोना रजित अशोक जाधव, पाना श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, पोकॉ विनोद सुभाष पाटील, कॉ मुरलीधर सखाराम बारी हे पथक आईन्स फॅक्टरी, वरणगाव येथे रवाना झाले.
तालुक्यातील विदगाव येथील वैष्णवी हॉटेल येथे आरोपी सागर दिलीप कोळी वय २६ रा.वाल्मिक मंदिरा जवळ विदगाव याच्या कडून ०१ गावटी कट्टा व ०३ जिवंत काडतुस असे एकूण 33 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. भुसावळ तालुक्यातील वरणगाव ऑर्डन्स फॅक्टरीच्या फाटया जवळील उड्डान पुलाखाली संजय गोपाल चंदेले (वय ८७) रा.दयांपूर शिवार ऑर्डन्स फॅक्टरी, वरणगाव ता.भुसावळ, गजानन शांताराम वानखेडे (वय २८) रा.तरोडा ता.मुक्ताईनगर, निखिल महेश चौधरी (वय २२) रा. रनीमाळा नगर, वरणगाव ता.भुसावळ याच्या कडून 04 गावटी पिस्तोल, 01 मॅगझीन व 04 जिवंत काडतुस असा 1 लाख 18 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.