उत्तर महाराष्ट्र

नाशिक : अखेर पोलिसांनी केला ‘त्या’ खुनाचा उलगडा; पत्नीसह प्रियकर ताब्यात

अमृता चौगुले

दिंडोरी (नाशिक); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील देहरेवाडी ते राशेगाव रस्त्यालगत झालेल्या पिंपळगाव ब. येथील व्यक्तीच्या खुनाच्या गुन्ह्याची दिंडोरी पोलिसांनी उकल केली. याप्रकरणी अनिल झेंडफळे या व्यक्तीच्या खून प्रकरणी मुख्य संशयित म्हणून मृत व्यक्तीची पत्नी व तिचा प्रियकर यांना अटक करण्यात दिंडोरी पोलिसाना यश आले आहे.

याबाबतचे वृत्त असे की, दि.२ जून रोजी नाशिक ते पेठ रस्त्यालगत देहरेवाडी ते रासेगाव रोडवर पिंपळगाव बसवंत येथील अनिल राजाराम झेंडफळे याचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत दिंडोरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी घटनेचा अधिक तपास केला. खून झालेल्या व्यक्तीची पत्नी सुनिता अनिल झेंडफळे हिचे दीपक दत्तू गवे (रा. रवळगाव, ता. दिंडोरी, सध्या रा. पालखेड बंधारा, ता दिंडोरी) याच्याशी सहा वर्षापासून अनैतिक संबंध होते.

मृत अनिल झेंडफळे हा आपली पत्नी सुनिता हिला दारू पिऊन त्रास देत होता. या कारणामुळे सुनीता व दीपक गवे यांनी संगनमत करून दि. २ जूनच्या रात्री देहरेवाडी खराडी शिवारात अनिल याला दारू पाजून देहरेवाडी ते राशेगाव रस्त्याच्या लगत घेऊन गेले. त्यानंतर अनिलच्या डोक्यात मागील बाजूस लोखंडी हातोडीने वार करून जीवे मारले. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने अनिलचे प्रेत रस्त्याच्या कडेला फेकून दिले.

याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी आरोपीच्या फोनच्या कॉल डिटेलच्या आधारे खुनाच्या गुन्ह्याची उकल करीत दोन्ही संशयितांना अटक केली. याबाबत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपअधीक्षक माधुरी कांगणे, कळवनचे उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, उपनिरीक्षक अजय कौटे, पोलीस नाईक धनंजय शीलावटे, बाळा पानसरे संदीप कडाळे, युवराज खांडवी यांच्या पथकाने अधिक तपास करीत संशयित आरोपींना गजाआड केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT