Nushrat Bharucha advice on Condom : ‘कंडोम’बाबत नुसरत भरुचाने मुलींना दिला ‘हा’ धक्कादायक सल्ला! | पुढारी

Nushrat Bharucha advice on Condom : ‘कंडोम’बाबत नुसरत भरुचाने मुलींना दिला ‘हा’ धक्कादायक सल्ला!

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री नुसरत भरुचा सध्या तिच्या ‘जनहित में जारी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात कंडोमचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. चित्रपटात नुसरतने कंडोम विक्रेत्याची भूमिका साकारली आहे. पुरुषांपेक्षा महिलांना कंडोमची अधिक गरज असल्याचेही विधान नुसरतने केल्यानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. जर मुलांनी कंडोम खरेदी केले नाहीत तर मुलींनी सॅनिटरी पॅड्सप्रमाणे कंडोम सोबत ठेवावेत, असेही धाडसी वक्तव्य अभिनेत्रीने केले आहे. (Nushrat Bharucha advice on Condom)

‘जनहित में जारी’ हा एक कौटुंबिक चित्रपट आहे ज्यात नुसरत भरुचा सेल्स गर्लच्या भूमिकेत आहे. चित्रपटात नुसरत भरुचा ज्या कंपनीत काम करत आहे, त्या कंपनीत एकही मुलगी काम करत नाही. सगळी मुलं काम करतात. यामुळे तिने साकारलेल्या पात्राला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नुसरतला अशाच काही समस्यांना सामोरे जावे लागले. ‘जनहित में जारी’ या चित्रपटात कंडोम विकणाऱ्या सेल्स गर्लची भूमिका साकारताना काही लोकांनी तिला टार्गेट केले. तिची खिल्ली उडवली. पण नुसरतने याकडे कानाडोळा करत चित्रपट पूर्ण केलाच. आता प्रदर्शनासाठीही सज्ज झाला आहे. छोट्या शहरातील सामाजिक परिस्थितीचे विनोदी चित्रण असलेला ‘जानीहित में जारी’ हा चित्रपट या शुक्रवारी चित्रपटगृहात झळकणार आहे. (Nushrat Bharucha advice on Condom)

पुरुषांपेक्षा महिलांसाठी कंडोम अधिक महत्त्वाचे…

नुसरत भरुचाने एका प्रसिद्ध हिंदी भाषिक दैनिकाशी संवाद साधताना सांगितले की, कंडोम किती महत्त्वाचे आहेत, हे मला या चित्रपटासाठी संशोधन करताना समजले. तेव्हा माझ्या लक्षात आले की सामान्य लोक कंडोमला केवळ सुरक्षित सेक्सचे साधन मानतात. पण त्याचे महत्त्व त्याहून अधिक आहे. विशेषतः महिलांसाठी. आपल्या समाजात कंडोमकडे केवळ सुरक्षित लैंगिकतेच्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. खरेतर याबाबतची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. कंडोमकडे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. (Nushrat Bharucha advice on Condom)

‘मुलींनी सॅनिटरी पॅड प्रमाणेच पर्समध्ये कंडोम ठेवावे’

नुसरत पुढे म्हणाली की, पुरुषांकडून कंडोम न वापरल्याने महिलांना सर्वाधिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे गर्भपाताचा धोका वाढतो. जर मुलांनी कंडोम खरेदी केले नाही तर मुलींनी सॅनिटरी पॅड्सप्रमाणे कंडोम त्यांच्या पर्समध्ये ठेवावे कारण ते त्यांच्या सुरक्षिततेसाठी आहे’, असे धाडसी विधान केले आहे. (Nushrat Bharucha advice on Condom)

‘जनहित में जारी’चे दिग्दर्शन जय बसंतू सिंह यांनी केले आहे. या चित्रपटात विजय राज, टिनू आनंद आणि ब्रिजेंद्र कालासारखे कलाकार आहेत. हा चित्रपट 10 जून रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाची कथा राज शांडिल्य यांनी लिहिली आहे.

Back to top button