foreign liquor seizure dhule File Photo
धुळे

Dhule News: पशुखाद्याच्या गोण्यांच्या आडोशाने विदेशी दारूची तस्करी; २० लाखांचा मुद्देमालासह कंटेनर जप्त, चौघांवर गुन्हा दाखल

नाशिक येथून धुळे शहराकडे पशुखाद्याच्या गोण्यांच्या आडोशाने विदेशी दारूची तस्करी करण्याचा प्रयत्न स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या पथकाने हाणून पाडला.

पुढारी वृत्तसेवा

Dhule News

धुळे : नाशिक येथून धुळे शहराकडे पशुखाद्याच्या गोण्यांच्या आडोशाने विदेशी दारूची तस्करी करण्याचा प्रयत्न स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या पथकाने हाणून पाडला. या प्रकरणात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कंटेनरसह सुमारे 20 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नाशिक येथून मुंबई-आग्रा महामार्गाने धुळे शहराकडे (एम एच 14 जीयु 5553) कंटेनरमधून दारूची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सपोनि दिपक ढोके, पोलीस अंमलदार शिरिष भदाणे, सदेसिंग चव्हाण, संदिप पाटील, सतिश जाधव, मच्छिद्र पाटील, जितेंद्र अहिरराव, महेंद्र सपकाळ, अतुल निकम, राजीव गिते या पथकाच्या मदतीने मुंबई-आग्रा महामार्गावर गस्त वाढवून अवधान शिवारामध्ये सापळा लावला होता.

अवधान टोल नाक्यावरून संशयित कंटेनर येताना दिसताच पथकाने कंटेनर थांबवून चालकाकडे विचारपूस सुरू केली. चालकाने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केल्याने पथकाने कंटेनरची पाहणी केली असता त्यात सुरुवातीला पशुखाद्याच्या गोण्या ठेवण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर दारूचे बॉक्स ठेवण्यात आल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे पथकाने हा कंटेनर थेट स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात आणला.

यामध्ये सुमारे 3 लाख 16 हजार 800 रुपये किमतीचा केवळ दमण आणि दिव येथे विक्री करण्यासाठी तयार केलेल्या दारूचे 120 बॉक्स, तसेच सुमारे 4 लाख 83 हजार 840 रु. कि. चे रॉयल चॅलेंज कंपनी दारुचे एकुण 112 बॉक्स, सुमारे 38 हजार 800 रुपये किमतीचे डीएसपी ब्लॅक व अन्य दारूचे दहा बॉक्स, सुमारे 76 हजार 800 रुपये किमतीचे सिगराम ब्लेंडर्स कंपनीचे दारूचे दहा बॉक्स, सुमारे 46 हजार रुपये किमतीचे सिग्नेचर दारूचे सात बॉक्स, सुमारे 36 हजार रुपये किमतीचे मॅजिक मोमेंट कंपनीच्या दारूचे सहा बॉक्स व अन्य दारूचे बॉक्स यासह दहा लाखाची गाडी असा 20 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

यासंदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गाडीचा चालक विजय सुरेश ठाणगे व क्लीनर इसाक नुर शेख, (दोन्ही राहणार वार्ड नं. 1, दशमेश नगर, श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर) यांची चौकशी केली असता यातून दारूचा हा साठा विशाल सुरेश ठाणगे (रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) याने विदेशी दारुचा साठा भरुन देऊन बापू वाणी उर्फ विनोद वसंत देशमुख (रा. चोपडा, जि. जळगाव) याच्याकडे घेवून जात असल्याबाबत सांगितले. त्यानुसार आता या चौघांच्या विरोधात मोहाडी नगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT