धुळे पुढारी वृत्तसेवा- मध्य प्रदेशातून गुजरात राज्यात मध्याची तस्करी करण्याचा प्रकार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने हाणून पाडला आहे. या कारवाईत पोलिसांनी २८ लाखाच्या मद्यासह वीस लाखाचा कंटेनर जप्त केला आहे. या आठवड्यात धुळे जिल्हा पोलीस दलाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य तस्करीची सलग दुसरी कारवाई करून दोन्ही कारवाईत सुमारे 84 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याने मद्य तस्करांचे धाबे दणाणले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेची कारवाई म्हणून धुळ्याची पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महामार्गावर गस्ती करण्याचे आदेश दिले आहे. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने पुष्पा स्टाईल मद्य तस्करी करण्याचा प्रकार धुळ्यात आणून पाडला. या कारवाईत 36 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्या पाठोपाठ आता शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी देखील मध्य तस्करांना दणका दिला आहे.
मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा कडुन शिरपुर मार्गे गुजरात राज्यात एक टाटा कंपनीचे कंटेनर मध्ये देशी-विदेशी दारुची अवैध वाहतुक करुन घेवुन जाणार आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्याने त्यांनी तातडीने पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांना हा प्रकार निदर्शनास आणून देऊन पथकाला कारवाई करण्यासाठी रवाना केले या पथकातील श्रीराम पवार यांच्यासह पोहेकॉ संतोष पाटील, संदिप ठाकरे, कैलास पवार, सुनिल पाठक,योगेश मोरे, संजय भोई, स्वप्नील बांगर, भुषण पाटील, मनोज पाटील अशांना राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर पळासनेर गावाजवळ चेकपोस्टवर नाकाबंदी करुन सदर वाहनाचा शोध सुरू केला. चेकपोस्टवर नाकाबंदी दरम्यान वाहने चेक करीत असतांना बातमी प्रमाणे टाटा कंपनीचे कंटेनर क्र. एन एल 01 एजी 9252 हे येतांना दिसले. वाहनावरील चालकास वाहन थांबविण्याचा ईशारा केला असता वाहन चालक याने त्याच्या ताब्यातील वाहन थांबविले. वाहन चालक यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विजयकुमार प्रतापसिंग राजस्थान, व क्लीनर प्रदिपकुमार मानसिंग राजस्थान असे सांगीतले. या वाहनात भरलेल्या मालाबाबत विचारपुस केली असता त्यांनी कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तरे दिले नाही. त्या मुळे वाहनाची तपासणी केली असता त्यात देशी-विदेशी कंपनीची दारु मिळुन आली. या वाहनात 17 लाख, 28, हजार रुपये किमतीची समर स्पेशल वोडकाचे एकुण 120 खोके,7 लाख 5 हजार 600 रुपये किमतीची रशियन वोडकाचे एकुण 49 खोके, 4 लाख 15 हजार रुपये किमतीची मॅकडॉवेल चे एकुण 131 खोके तसेच 20 लाखाचा कंटेनर असा एकुण 48 लाख 48 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा –