धुळे : धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी तातडीने पदभार स्वीकारावा, असे आदेश अपर मुख्य सचिव डॉ.राजगोपाल देवरा यांनी आज (दि.५) अध्यादेश जारी केला आहे.
धुळे येथील तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची २० जून २०२३ मध्ये नाशिक येथे बदली झाली. त्यांच्या जागी अभिनव गोयल यांनी धुळ्याच्या जिल्हाधिकारी पदाचा कारभार हाती घेतला. मात्र अवघ्या एका वर्षामध्ये त्यांची देखील बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पापळकर यांनी तातडीने पदभार स्वीकारावा, असा अध्यादेश अपर मुख्य सचिव डॉ.राजगोपाल देवरा यांनी जारी केला आहे.
नवनियुक्त जिल्हाधिकारी जे.एस.पापळकर हे २०१० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.त्यांनी यापूर्वी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. सध्या ते हिंगोलीचे जिल्हाधिकारी आहेत. शासनाने त्यांची धुळे जिल्हाधिकारीपदी बदली केली असून त्यांनी पदभार अन्य अधिकार्याकडे सोपवून धुळे जिल्हाधिकारी पदाचा पदभार मावळते जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडून घेण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीपासून जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची बदली होणार असल्याची चर्चा धुळे जिल्ह्यात होती. या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला.