Dhule News | खून का बदला खून! आजोबाच्या खुनातील संशयित वृद्धाचा खून; एकाला जन्मठेप

धुळ्यातील वार शिवारात २००६ मध्ये खुनाची घटना
Dhule Murder Case
धुळे, वार शिवारातील खून प्रकरणी दोषी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. file photo
Published on
Updated on

धुळे; पुढारी वृत्तसेवा : आजोबाच्या खुनात सहभाग असल्याच्या संशयातून वृद्धावर धारदार हत्याराने वार करून खून करणाऱ्या दोषी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एम. आहेर यांनी आज (दि. ३१) सुनावली. जन्मठेपेची शिक्षा तसेच दहा हजार रुपयाचा दंड व तो न भरल्यास एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षेचा आदेश दिला आहे. (Dhule News)

Dhule Murder Case
धुळे-सोलापूर मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत तरूण पत्रकाराचा मृत्यू

धुळे तालुक्यातील वार शिवारात २००६ मध्ये घटना

याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे तालुक्यातील वार शिवारात 2006 मध्ये भाईदास उखडू पारधी यांचा खून झाला होता. या खूनाच्या प्रकरणामध्ये आत्माराम हिरामण पारधी यांचा हात असल्याचा संशय मृताचा नातू ज्ञानेश्वर दगडू पवार (पारधी) याला होता. हा राग ज्ञानेश्वर याच्या मनात असल्यामुळे त्याने आजोबाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी 19 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आत्माराम हिरामण पारधी (वय 70) याला वार गावातील कालिका मंदिराजवळ गाठले. यावेळी त्याने खूनाचा वाद उकरून काढला. यानंतर आत्माराम पारधी याच्या शरीरावर धारदार हत्याराने अनेक वार केले. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या आत्माराम पारधी यांचा मृत्यू झाला. (Dhule News)

Dhule Murder Case
धुळे : नागपूर-सुरत महामार्गावर लूटमार करणारी टोळी जेरबंद

ज्ञानेश्वर पारधी याच्याविरोधात गुन्हा

या संदर्भात शांताराम पारधी यांनी दिलेले फिर्यादीनुसार पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर पारधी यांच्या विरोधात भादवी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी. एम. आहेर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू झाली. या खटल्याच्या कामी सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. अजय एस. सानप यांनी तपासले. त्यात घटनास्थळाचे पंच साक्षीदार, हत्यार जप्तीचे पंच साक्षीदार, फिर्यादी तथा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व इतर साक्षीदार, डॉक्टर, व तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक रविंद्र. एन. देशमुख यांची साक्ष नोंदविण्यात आली. (Dhule News)

Dhule Murder Case
Dhule Crime News | धुळे जिल्ह्यातून मोटार सायकली चोरणारे तिघे गजाआड

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे युक्तीवाद करताना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अजय सानप यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष व इतर तपासण्यात आलेल्या साक्षीदाराची साक्ष तसेच अभिलेखावर असलेल्या रासायनिक विश्लेषनाचे अहवाल व आलेल्या पुराव्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचा आधार घेत आरोपीस जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, असा युक्तीवाद केला.

Dhule Murder Case
धुळे : भोरखेडा येथे 'पुष्पा स्टाईल'ने चंदनाची चोरी

या खटल्यातील संपूर्ण पुराव्यांचा व सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकालांचा विचार करुन जिल्हा व सत्र न्यायाधिश डी. एम. आहेर यांनी आरोपीस भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा तसेच दहा हजार रुपयाचा दंड व तो न भरल्यास एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षेचा आदेश केला.

Dhule Murder Case
धुळे : कुसुंबा आश्रम शाळेतील 53 मुलांना साथीच्या रोगाची लागण

या कामी फिर्यादी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अजय सानप यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह वाय. तवर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्यांना पैरवी अधिकारी महिला पोलीस कर्मचारी एल. एस. चौधरी व पोलीस नाईक एस. एल. परदेशी यांचे सहकार्य लाभले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news