ATM Robbery Foiled AI Photo
धुळे

Dhule ATM Theft | एटीएम फोडण्याचा प्रयत्न सायरनमुळे उधळला; सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी जेरबंद

धुळे शहरातील वाडीभोकर रस्त्यावरील एटीएम सेंटरमध्ये चोरीचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

Dhule ATM Robbery Foiled

धुळे : धुळे शहरातील वाडीभोकर रस्त्यावरील एटीएम सेंटरमध्ये चोरीचा प्रयत्न कंपनीच्या कंट्रोल रूममधील सायरन वाजल्याने हाणून पाडण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाल करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या काही तासांत संशयित आरोपीला अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकी तसेच एटीएम फोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

देवपूर परिसरातील व्यंकटेश वाडीभोकर प्लाझा येथे एनसीआर कंपनीचे एटीएम आहे. मध्यरात्रीच्या सुमारास एका व्यक्तीने एटीएम मशीनशी छेडछाड करण्यास सुरुवात केली. यावेळी कंपनीच्या कंट्रोल रूममधील सुरक्षा यंत्रणेचा सायरन वाजल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने धुळे पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान, पोलीस नियंत्रण कक्षामार्फत वाडीभोकर रोड परिसरात गस्त घालणाऱ्या पथकाला सतर्क करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यातून मिळालेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे संशयिताचा शोध सुरू करण्यात आला.

पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील, उपनिरीक्षक साईनाथ तळेकर, उपनिरीक्षक विलास भामरे आणि त्यांच्या पथकाने शोधमोहीम राबवित जयहिंद महाविद्यालय परिसरातून एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव समीर शहा रमजान शहा असे सांगितले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून चोरीची दुचाकी तसेच एटीएम मशीनची तोडफोड करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. प्राथमिक चौकशीत संबंधित दुचाकीही चोरीची असल्याची कबुली त्याने दिली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीकडे अधिक चौकशी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT