Dhule Drowning | निमडाळे तलावात दुहेरी दुर्घटना; वृद्धाचा मृतदेह शोधताना तरुणाचाही बुडून मृत्यू

ळे तालुक्यातील निमडाळे गावात हृदयद्रावक घटना
Drowning Death
Drowning Death File Photo
Published on
Updated on

Dhule Nimdale Lake Double Drowning Accident

धुळे : धुळे तालुक्यातील निमडाळे गावात रविवारी हृदयद्रावक घटना घडली. तलावात बुडालेल्या वृद्धाचा मृतदेह शोधण्यासाठी पाण्यात उतरलेल्या तरुणाचाही बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

निमडाळे येथील बापू पांडुरंग पाटील (वय ६५) हे नेहमीप्रमाणे गावातील तलाव परिसरात म्हशी चारण्यासाठी गेले होते. तलावाच्या भिंतीलगतून जात असताना त्यांचा पाय घसरल्याने ते पाण्यात पडले. परिसरातील काही तरुणांच्या ही बाब लक्षात आली; मात्र मदत मिळण्यापूर्वीच ते पाण्यात बुडाले.

Drowning Death
Dhule News | ठेकेदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे आणि बेजबाबदारपणामुळे वाघाडी फाट्यावर तासनतास वाहतूक कोंडी; वाहनचालक त्रस्त

घटनेची माहिती गावात पोहोचताच ग्रामस्थ आणि तरुणांनी तलावाकडे धाव घेतली. बापू पाटील यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असताना त्यात यश येत नव्हते. त्यानंतर गावातीलच दशरथ नाना मोरे (वय ३८) यांनी धाडसाने तलावात उडी घेत मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळ उलटूनही ते पाण्याबाहेर न आल्याने त्यांच्याही बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली.

यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर बापू पाटील आणि दशरथ मोरे या दोघांचेही मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले. एकाच दिवशी, एकाच गावातील दोन व्यक्तींचा बुडून मृत्यू झाल्याने निमडाळे गावात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण पसरले आहे.

या दुर्दैवी घटनेची नोंद पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news