

धुळे : धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथील वाघाडी फाट्याजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामात संबंधित ठेकेदाराच्या ढिसाळ आणि चुकीच्या नियोजनामुळे राष्ट्रीय महामार्गावर दररोज तीव्र वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीमुळे वाहनचालकांना तासनतास अडकून पडावे लागत असून, प्रवासी, नागरिक आणि शाळकरी मुलांचे प्रचंड हाल होत आहेत.
उड्डाणपुलाच्या सुरू असलेल्या कामामुळे राष्ट्रीय महामार्गावर तीव्र वाहतूक कोंडी होत असून, वाहनचालकांना तासनतास रेंगाळत राहावे लागत आहे. ठेकेदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. निकृष्ट व्यवस्थापनामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मुख्य रस्ता बंद करताना योग्य आणि सुव्यवस्थित सर्व्हिस रोड (पर्यायी रस्ता) तयार केला गेलेला नाही त्यामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
उड्डाणपुलाचे काम सुरू करताना वाहनचालकांसाठी सुव्यवस्थित पर्यायी रस्ता (सर्व्हिस रोड) देणे ठेकेदाराला बंधनकारक होते. मात्र, सद्यस्थितीत सर्व्हिस रोडवर मोठमोठे खड्डे पडले असून, रस्ता अत्यंत संकुचित झाला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पाण्याचा साठा होत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. ठेकेदाराच्या या मनमानी कारभारामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या चुकीच्या नियोजनामुळे रुग्णवाहिका, शाळकरी मुले आणि नोकरदार नागरिक तासनतास कोंडीत अडकून पडत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन ठेकेदारावर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी येथे तात्काळ उपाययोजना करण्यात यावी, अशी तीव्र मागणी नागरिक करत आहेत. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्या नेतृत्वाखाली नगाव येथील आमदार कार्यालयात संबंधित ठेकेदार पोलीस अधिकारी एन.एच.ए.आय. अधिकारी सर्व कर्मचारीयांची बैठक घेण्यात आली. सोनगीर बस स्टँड ते वाघाडी फाट्या पर्यंत सर्विस रोड होत नाही तोपर्यंत वाघाडी फाट्यावरील उड्डाणपुलाचे काम(बंद) थांबवण्यात यावे असे स्पष्ट संबंधित यंत्रणेला सांगण्यात आले.
माननीय नितीन गडकरी साहेबांकडे पत्रव्यवहार करून सर्विस रोडच्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी दिल्ली येथे जाणार आहेत एन.एच.ए.आय. चे मा. पवार यांनी मीटिंगमध्ये शब्द दिला आहे सर्विस रोड पूर्ण झाल्यानंतरच वाघाडी फाट्यावरील उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे तोपर्यंत काम (बंद) स्थगिती सोनगीर गावातील सर्व नागरिकांनी घेण्यास सांगितले.