धुळे : पुढारी वृत्तसेवा; सिनेट बैठकित विद्यापीठ विकास व परीक्षा विभागासाठी स्वतंत्र एक एक तास चर्चा घडवून आणण्यास पुरवणी कार्यक्रम पत्रिकेत विषयांचा समावेश करण्याच्या विद्यापीठ विकास मंचच्या आग्रही मागणीला उमवीचे कुलगुरू डॉ. व्ही. एल माहेश्वरी आणि विद्यापीठप्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
संबधित बातम्या :
दि.३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या सिनेटच्या बैठकित विद्यापीठ विकास व परीक्षा विभागावर स्वतंत्र एक तास चर्चा करणेकामी पुरवणी कार्यक्रमपत्रिकेत या विषयांचा अंतर्भाव करणेसाठी विद्यापीठाचे कुलगुरू व कुलसचिव यांना विद्यापीठ विकास मंचच्या सदस्यांद्वारे निवेदन सादर करण्यात आले होते. या विषयांचे महत्त्व लक्षात घेता निवेदनास कुलगुरू यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दिनांक 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सिनेटच्या बैठकीत पुरवणी कार्यक्रम पत्रिकेत इतर विषयांसोबत विद्यापीठ विकास व परीक्षा विभागावर स्वतंत्र चर्चेसाठी विषयांचा अंतर्भाव करण्यास संमती दिली आहे.
विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधनात्मक, प्रशासकिय, सांस्कृतिक भौगोलिक तसेच विद्यार्थी गुणवत्ता वाढ, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, उच्च शिक्षणातील बदल, नवीन संधी, इ.दृष्टिकोनातून गुणवत्ता वाढीसाठी भविष्यात कोणकोणत्या उपाययोजना राबवता येऊ शकतात किंवा सद्यस्थितीत चालू असलेल्या योजनांमध्ये अजून अधिक काय सुधारणा करता येईल इत्यादी बाबत सर्वंकष चर्चा करून काही नवीन योजना, उपक्रम, कार्यक्रम, अभ्यासक्रम सुरु करण्याच्या दृष्टीने विकासाच्या तासाला चर्चा अपेक्षित आहे.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे परीक्षा विभाग विद्यापीठाचा आत्मा असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विभाग आहे. त्या अनुषंगाने परीक्षा विभागामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षा, त्यांचे लागलेले निकाल, निकालाबाबत विद्यार्थ्यांमधील असलेला असंतोष, तसेच पुनरतपासणी आणि पुर्नमूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी सादर केलेले अर्ज, त्या संदर्भात विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी इत्यादी बाबतीत परीक्षा विभागाच्या कार्यपद्धती बाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी परीक्षा विभाग अधिक सक्षम करणे अशा विषयावर चर्चा करण्यासाठी परीक्षा विभाग गुणवत्ता वाढ असा विषय सिनेटच्या कार्यक्रम पत्रिकेत घेण्यात आला आहे.
सदर विषयात काही सूचना अथवा प्रस्ताव असतील तर विद्यापीठ परिक्षेत्रातील जाणकार मंडळीनी आपल्या भागातील सिनेट सदस्यांपर्यंत सदर सूचना व प्रस्ताव पाठवावेत. जेणेकरुन सभागृहात संबंधित विषय मांडणे सोयीचे होईल. असे आवाहन विद्यापीठ विकास मंचतर्फे सिनेत सदस्य नितीन ठाकूर, दिनेश चव्हाण, अमोल मराठे, अमोल सोनवणे, प्रा. सुनील निकम, प्रा. दिनेश खरात, प्रा.केदारनाथ कवडीवाले, स्वप्नाली काळे, दिनेश नाईक यांनी केले आहे.
हेही वाचा :