Illegal Weapon Arrest Dhule  Pudhari
धुळे

Dhule Crime | धुळे पोलिसांची कारवाई; बनावट पिस्तूल व जिवंत काडतूसासह तरुण ताब्यात

मोहाडी उपनगर पोलिसांची राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील उड्डाणपुलाजवळील सर्विस रोड परिसरात सापळा रचून कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Illegal Weapon Arrest Dhule

सोनगीर : धुळे शहरातील मोहाडी उपनगरात पोलिसांनी कारवाई करत एका तरुणाला बनावट पिस्तूल आणि जिवंत कारतूसासह ताब्यात घेतले. या प्रकरणी मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे मोहाडी उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील उड्डाणपुलाजवळील सर्विस रोड परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित तरुणाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान त्याने आपले नाव सचिन संजय पवार (वय २४, रा. शिवनंद कॉलनी, मोहाडी उपनगर, धुळे) असे सांगितले. झडतीदरम्यान त्याच्याकडून सुमारे ४० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि १ हजार रुपये किमतीचे जिवंत कारतूस जप्त करण्यात आले. पिस्तुलामध्ये बॅरल, फायरिंग पिन, ट्रिगर आदी भाग तयार केलेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही गंभीर गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT