Dhule Crime | फोन केला नाही, म्हणून पत्नीचा डोक्यात दगड घालून खून

शिरपूर तालुक्यातील खैरखुटी येथील घटना
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

Crime in Shirpur Dhule

धुळे : बाहेरगावी असताना फोन केला नाही, या किरकोळ कारणांमुळे पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची घटना खैरखुटी येथे घडली आहे. शिरपूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करुन मारेकरी पतीस अटक केली आहे.

शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील खैरखुटी गावात सुनील सायमल पावरा (वय 30 ) हा तीन-चार दिवसांपासून तो बाहेरगावी असताना पत्नी ललिता सुनील पावरा (वय 25 ) हिने त्यास फोन केला नाही.

Crime News
Dhule Crime | धुळे पोलिसांकडून अंमली पदार्थांचा ७ कोटींचा साठा नष्ट

या किरकोळ कारणारुन तिच्याशी वाद घालून रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात दगड टाकला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिरपूर तालुका पोलीस स्टेशन कडून तात्काळ घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.

यासंदर्भात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोसइ मनोज कचरे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news