पिंपळनेर, (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- साक्री तालुक्यातील निजामपूर पोलिसांनी प्रथमतःच एक अभिनव उपक्रम राबविला. परिसरात पवन ऊर्जा व सोलर ऊर्जा प्रकल्पात सुरक्षेच्या दृष्टीने सिक्युरिटी 2 कसे चालते याची प्रकल्प क्षेत्रात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. साक्रीचे उपविभागीय पोलिस अधिकारी 2, निजामपूरचे एपीआय हनुमंत गायकवाड यांच्यासह पनीचे अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला पोलिस अधिकाऱ्यांनी सोलर प्रकल्प सुरक्षेच्या दृष्टीने सिक्युरिटीचे काम कसे चालते, याची पाहणी करून सुरक्षा कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
निजामपूर पोलिस ठाणे हद्दीत या दोन्ही प्रकल्पांचे क्षेत्र 4 हजार 100 एकर आहे. चोरटे त्यातील तांबा, तार वगैरेंची चोरी करतात. अशा स्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने काम कसे चालते, याची पाहणी पोलिसांनी केली. तसेच कॉपर केबल वायर चोऱ्या होऊ नयेत यासाठी काळजी घेण्याच्या दृष्टीने प्रकल्पात पुरेशी प्रकाश व्यवस्था असणे सीसीटीव्हीचे सर्व दूर लक्ष देता येईल असे नेटवर्क असणे, कर्मचारी प्रशिक्षित करणे आदींबाबतीत अवश्य त्या सुचना देण्यात आल्यात.
हेही वाचा –