धुळे

Dhule crime | शिरपूर तालुक्यात बनावट देशी दारू तयार करण्याचे केंद्र उध्वस्त

एका कुडाच्या घरात काही इसम बनावट देशीदारू तयार करण्याच्या व्यवसाय करीत असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली होती

पुढारी वृत्तसेवा

धुळे : शिरपूर तालुक्यात बनावट देशी दारू तयार करण्याचा मिनी कारखाना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकाने उध्वस्त केला आहे. या बनावट दारू तयार करण्याच्या केंद्रा मधून सर्वजण फरार झाल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हाडाखेड सीमा तपासणी नाक्याचे दुय्यम निरीक्षक संतोष निकम यांना शिरपूर तालुक्यातील धाबादेवी पाडा रोडरोड मौजे नवीन धाबापाडा शिवारात नाल्या किनारी एका कुडाच्या घरात काही इसम बनावट देशीदारू तयार करण्याच्या व्यवसाय करीत असल्याची गुप्त बातमी मिळाली.

सदर ठिकाणी छापा टाकला असता या ठिकाणी बनावट देशी दारू टॅगोपंच 90 मिली क्षमतेच्या एकुण 18,000 सीलबंद बाटल्या (180 बॉक्स), एकुण 2 कॅप सिलिंग मशीन, तयार देशी दारू 400 लिटर, स्पिरीट वासाचे रिकामे 2 प्लास्टिक ड्रम, देशीदारू भरण्यासाठी 90 मिलीच्या एकुण 10 हजार रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या व एक महिंद्रा कंपनीचे बोलेरो पिक-अप चारचाकी वाहन तिचा परिवहन क्र एम एच 18- बिजी -5456 असे बनावट मद्य निर्मितीचे इतर साहित्य मिळून एकूण 17,लाख 18,हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बनावट देशीदारू तयार करण्याचा कारखाना उध्वस्त करून मुद्देमाल जप्त करून घर मालक व बनावट मद्याचा मालक तसेच फरार आरोपी व संशयित यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमचे कलम 65 (ब) (क) (ड) (ई) (फ) 80, 81, 83, व 108 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच त्यास सदरचे साहित्य पुरविणारे व इतर साथीदार यांचा शोध घेण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT