Dhule Illegal Liquor Factory | शिरपूर तालुक्यात बनावट देशी दारू कारखान्यावर कारवाई; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

शिरपूर तालुक्यातील चांदसुर्या गावात सुरू असलेला बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना शिरपूर शहर पोलिसांनी उद्ध्वस्त केला.
Shirpur Taluka Fake Country Liquor
बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना शिरपूर शहर पोलिसांनी उद्ध्वस्त केलाPudhari
Published on
Updated on

Shirpur Taluka Fake Country Liquor

धुळे : शिरपूर तालुक्यातील चांदसुर्या गावात सुरू असलेला बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना शिरपूर शहर पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईत सुमारे ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात बनावट दारू, स्पिरीट, रिकाम्या बाटल्या, स्टिकर्स आणि दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य व यंत्रसामग्रीचा समावेश आहे.

शिरपूर तालुक्यात बनावट दारू तयार होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना मिळाल्यानंतर त्यांनी सर्व पोलीस ठाण्यांना अशा बेकायदेशीर कारखान्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून छापा टाकण्यात आला.

Shirpur Taluka Fake Country Liquor
Dhule News : धुळ्यात कचरा ठेकेदाराकडून महापालिकेची आर्थिक फसवणूक

या कारवाईदरम्यान नितेंद्र पोपटराव पावरा (रा. चांदसुर्या, ता. शिरपूर) हा स्वतःच्या घराच्या तळमजल्यावरील खोलीत तसेच पहिल्या मजल्यावरील रूम आणि किचन परिसरात बनावट ‘टँगो पंच’ देशी दारू तयार करत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी घर व परिसराची झडती घेतली असता आरोपीच्या ताब्यातून ८७ हजार रुपये किमतीचे ४३५ लिटर स्पिरीट, १ लाख १० हजार रुपये किमतीच्या ‘टँगो पंच’ स्टिकर लावलेल्या २२ हजार रिकाम्या बाटल्या, सुमारे १ लाख रुपये किमतीचे बाटल्या सीलबंद करण्याचे मशीन, तसेच बनावट दारू, बुच, स्टिकर्स आणि इतर साहित्य जप्त केले.

Shirpur Taluka Fake Country Liquor
Dhule Fraud: शेअर मार्केटच्या नावाखाली धुळ्यातील अभियंत्याची ३.१४ कोटींची फसवणूक; ४ जणांना अटक

या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५ (क), (ड), (इ), (फ), ८१ आणि ८३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news