उत्तर महाराष्ट्र

धुळे : साक्रीच्या शिक्षिकेचा हरियाणा भूषण पुरस्काराने सन्मान

अंजली राऊत

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील संत ठाकूर सिंग ज्ञानपीठ शाळेच्या शिक्षिका रेखा पाटील यांना चाइल्ड प्रोटेक्टर फाउंडेशन, महाराष्ट्रात शिक्षण आणि समाजसेवेच्या क्षेत्रात चांगले काम केल्याबद्दल कुरुक्षेत्रातील जयराम विद्यापीठात 'हरियाणा भूषण सन्मान' २०२२ राष्ट्रीय मानवता पुरस्काराने गौरविण्यात आले.

कार्यक्रमात 17 राज्यांतील 150 शिक्षक आणि शिक्षकांनी राष्ट्रीय अभिनव शिक्षक परिषदेत सहभाग नोंदवला. अरुण आश्री जिल्हा शिक्षणाधिकारी कुरुक्षेत्र, विशेष अतिथी रोहतास वर्मा, जिल्हा शिक्षण अधिकारी रोहतास कर्नाल, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हरिदास गुजरात, शिक्षक नरेश वाघ, बालरक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक मनोज चिंचोरे यांनादेखील यावेळी सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात दोन वेगवेगळ्या राज्यांतील शिक्षकांनी संस्कृतीची ओळख करून दिली. शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षकांचे कर्तव्य, सामाजिक निष्ठा, समर्पण, उत्कृष्ट नावीन्यपूर्ण शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी संस्थेतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मदनलाल यांच्या शिक्षणाचा वेध या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. नीलम सागवान यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ, शिक्षण, संरक्षण, गरजू मुले, महिला, आरोग्य कामगारवर्ग, मानसिक, कायदेशीर, स्वच्छतेच्या समर्थनासाठी जागरूकता, महिला सक्षमीकरण, करिअर प्रेरक वक्ता, समुपदेशन, सांस्कृतिक, स्वसंरक्षण इत्यादी उपक्रमात सहभाग घेतला.

हेही वाचा:

पिंपळनेर : रेखा पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना मुख्याध्यापक, संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी. (छाया : अंबादास बेनुस्कर)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT