धुळे, (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा ; भरधाव दुचाकीने विरुद्ध बाजुने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात एक ठार तर तिघे जखमी झाले. दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
सुरेश नोंदल्या मावळी (रा. रणमाळ पैकी गवळीपाडा ता. साक्री) व शेगजिमोना मावळी (वय ४६ रा.बालाजी नगर पिंपळनेर) हे दोघे साक्री येथून डॉ. विशाल वळवी यांच्या हॉस्पिटल मधून पिंपळनेर येथे दुचाकीने (क्र.एमएच १८ एक्यु ७६८५)जात होते. त्यादरम्यान धाडणे फाट्यावर समोरून येणाऱ्या दुचाकीने विरुद्ध बाजुने येवून त्यांना धडक दिली. त्यात सुरेश माळवी हा ठार झाला. तर शेगजिमोना मावळी व धडक देणारा संजय कांतीलाल सोनवणे (वय २१ रा.धाडणे ता.साक्री) हे दोघेही जखमी झाले. याप्रकरणी शेगजिमोना मावळी यांनी साक्री पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोना प्रमोद ईशी करीत आहेत.