उत्तर महाराष्ट्र

धुळे : डोक्यात दगड घालून हत्या करणाऱ्या आरोपीस औरंगाबाद येथे बेड्या

अंजली राऊत

धुळे : पुढारी वृत्तसेवा

तरुणी संदर्भात उलट सुलट चर्चा केल्यानेच अवधान शिवारात युवकाची हत्या झाल्याचे कारण पोलीस तपासात पुढे आले असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणी आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. खुनासाठी मदत करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला देखील मोहाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

धुळे शहरातील अवधान शिवारात सोना दूर कंपनीच्या मागील बाजूस असणाऱ्या मैदानात गुरुवार, दि.25 तरुणाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी बिअरचे रिकामे टीन आणि ग्लास आढळून आल्याने मद्यपान केल्यानंतरच या तरुणाची हत्या केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील तसेच मोहाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षण भूषण कोते यांच्या स्वतंत्र पथकाने आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू केले. यात पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकातील उपनिरीक्षक योगेश राऊत व बाळासाहेब सूर्यवंशी तसेच संजय पाटील, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, योगेश चव्हाण, राहुल सानप, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी आदी कर्मचाऱ्यांनी मारेकर्‍याचा माग काढत औरंगाबाद गाठले. या ठिकाणाहून मोहाडी उपनगरातील दंडेवाले बाबानगर भागात राहणारा चेतन प्रताप गुजराती या युवकाला पथकाने ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता गुजराथी याने एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने मिस्तरी याची हत्या केल्याची बाब मान्य केली. त्याच्या एका नातेवाईक असणाऱ्या महिलेची बदनामी मयत सतीश बापू मिस्तरी याने केल्याच्या संशयातून मिस्तरी याचा काटा काढण्याची बाब निदर्शनास आली आहे. या कामात मोहाडी उपनगरातच राहणारा एका अल्पवयीन बालकाला सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्या पथकाने ताब्यात घेतले. दोघा संशयितांची चौकशी केली असता त्यांनी मिस्तरी याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचे कबूली दिली. त्यापूर्वी घटनास्थळावरच मद्यप्राशन केल्याचे देखील निदर्शनास आले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT