श्री गजानन महाराज भक्त मंडळ अध्यक्ष प्रल्हाद महाराज भांड. 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक ते शेगाव सायकलवारीचे १ जानेवारीला प्रस्थान

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या २२ वर्षांपासून श्री गजानन महाराज भक्त मंडळ, नाशिक यांच्या वतीने 'नाशिक ते शेगाव' सायकलवारीचे १ जानेवारी २०२३ रोजी भांड न्यूज पेपर एजन्सी, श्री संत गजानन महाराज चौक, डीजीपीनगर क्र -2 अंबड येथून प्रस्थान होणार आहे. दि. ४ जानेवारी रोजी शेगाव येथे ही वारी पोहोचणार आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद महाराज भांड यांनी सुरू केलेली ही सायकलवारी आता वटवृक्ष होऊ पाहत आहे. सन २००० मध्ये सुरू झालेली ही सायकलवारी अखंडितपणे सुरू असून, विनाअपघात सायकलवारी पार पडली आहे. सुरुवातीला एकटेच जाणारे भांड महाराज आता ५० वारकऱ्यांचा समूह घेऊन जात आहेत. पर्यावरण संवर्धनाचा जागर करत, हरितक्रांतीचा संदेश आणि सायकलीचे महत्व सांगत ही सायकलवारी दररोज ११० किमीप्रमाणे चौथ्या दिवशी ४६० किलोमीटरचे अंतर पार करून शेगावात पोहोचते.

यावेळी भांड यांनी सांगितले की, वारीच्या कालावधीमध्ये ठिकठिकाणी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा संदेश सर्व वारकरी देणार आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी हरिपाठ व भजन होणार आहे. 'गण गण गणात बोते'चा गजर करत दर्शन घेऊन परतीचा प्रवास रेल्वेने होतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रल्हाद भांड यांनी संत गजानन महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजन केले व बैठकीला सुरुवात केली. यावेळी सदस्यांनी विचार मांडले. यावेळी सिताराम भांड, रमाकांत दातीर, विजय चौधरी, अविनाश दातीर, राहुल ऊकाडे, प्रमोद बोरसे, अरुण शिंदे, भक्ती बूब, संगीता रावते, संजय जाधव, सुरेश महाजन, राजेंद्र खाणकरी, शरद सरनाईक, अनिल भवर, विजय चौधरी , अविनाश दातीर, राकेश धामणे, पंकज ठाकरे, मिलिंद आहेर राजेंद्र भांड आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT