उत्तर महाराष्ट्र

Jalgaon knife attack : चाकू हल्ल्यातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू; दाेघांना अटक

backup backup

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : शहरातील रामेश्वर कॉलनीतील मेहरूण परिसरात चाकू हल्‍ल्‍यात जखमी झालेल्या  पवन उर्फ घातक मुकुंदा सोनवणे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या गुन्ह्यात दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Jalgaon knife attack)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रामेश्वर कॉलनी परिसरातील सोळा खोल्या येथे सागर पूनम कंडारे आणि विशाल विजय सपकाळे (रा. सिंध्दार्थ नगर रामेश्वर कॉलनी) हे शनिवारी ४ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास वाद करत होते. त्यावेळी सागर कंडारे हा मोठमोठ्याने आवाज करून तुमच्या 'एरीयाचा दादा पवन घातक याला बोलव, त्याला सुध्दा बघतो' असा ओरडत होता. त्यावेळी पवन हा त्याच्या घरात जेवण करत होता. त्याचा नावाचा उल्लेख केल्यामुळे पवन हा सागर आणि विशाल यांच्याकडे येवून दोघांच्या भांडणात माझे नाव का घेत आहात, असा जाब विचारला. त्यामुळे पवन आणि त्याच्या कुटुंबियाला सागर आणि विशाल यांनी शिवीगाळ केली. (Jalgaon knife attack)

यामध्ये पवन दोघांच्या अंगावर धावून गेला आणि तिघांमध्ये हाणामारी झाली. दरम्यान यात विशाल सपकाळे याने पवनला मागून पकडून धरले तर सागर कंडारे याने हातातील चाकूने पवन उर्फ घातक याच्यावर सपासप वार केले. यात पवन गंभीर जखमी झाला. त्याला शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. रविवारी मध्यरात्री उपचारादरम्यान त्‍याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पवनचा भाऊ प्रतिक मुकुंदा सोनवणे याच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सागर कंडारे आणि विशाल सपकाळे यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्‍यात आला आहे.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT