उत्तर महाराष्ट्र

Corona cases in Nashik : बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण दुप्पट

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यात (Corona cases in Nashik) कोरोना रुग्णांचा घसरता आलेख मंगळवारी (दि.१) कायम आहे. जिल्ह्यात दिवसभरात १४८२ कोरोनाबाधित सापडले. तर दुपटीने म्हणजे २८७४ रुग्ण या आजारातून बरे झाले. दुर्देैवाने ६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यात नाशिक शहरातील 3, ग्रामीणचे 2 तर मालेगावच्या एका मृताचा समावेश आहे.

नाशिक शहरात (Corona cases in Nashik) काेरोनाचे नव्याने ८६८ रुग्ण आढळून आले. ग्रामीण भागातील ५६३, जिल्ह्याबाहेरील ४५ व मालेगावी ६ रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. जिल्ह्यात आजमितीस सक्रिय रुग्णांची संख्या १३ हजार ४५० इतकी आहे. यामध्ये लक्षणे नसलेल्या बाधितांची संख्या सर्वाधिक म्हणजे ११,९५२ इतकी आहे. १४९८ रुग्णांमध्ये विविध लक्षणे आढळून आली. सद्यस्थितीत २६ रुग्ण व्हेंटिलेटरवर व १२६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोना मृतांची संख्या ८८१८ वर पोहोचली आहे. तसेच १६३८ संशयित रुग्णांचे अहवाल आजही प्रलंबित आहेत. (Corona cases in Nashik)

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा ;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT