नाशिक : नागरिक सभेत भारत जोडो यात्रेला पाठिंबा दर्शविताना नाशिककर. (छाया : हेमंत घोरपडे) 
उत्तर महाराष्ट्र

भारत जोडो यात्रा : जीवनमूल्ये संवर्धनासाठी… नागरिक सभेत उमटला सूर

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी 3600 किलोमीटरची भव्य पदयात्रा सुरू केली आहे. या यात्रेचे जोरदार स्वागत महाराष्ट्रासह विविध राज्यांत होत आहे. भारतीय जीवनमूल्ये संवर्धनासाठी ही यात्रा असल्याचा सूर भारत जोडो यात्रेनिमित्त सोमवारी (दि. 14) मेनरोडवरील गाडगे महाराज पुतळ्याजवळ झालेल्या नागरिक सभेत उमटला.

भारत जोडो यात्रेनिमित्त शहरासह उपनगरांमधील सामाजिक संघटना, संस्था, कार्यकर्ते, नागरिक, युवक, महिला यांच्या वतीने नागरिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे होते. सभेत राजेंद्र बागूल, निरंजन टकले, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, राजू देसले, सुरेश मारू, रमेश साळवे, नितीन मते, डॉ. नागार्जुन वाडेकर, जयवंत खडताळे, डॉ. महेंद्र नाकिल, देवीदास हजारे आदींनी मार्गदर्शन केले. 'नफरत छोडो… भारत जोडो', अशा तसेच महागाई – भष्ट्रचार – बेकारी – बेरोजगारीविरुद्ध तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी अशोक शेंडगे, ज्युली डिसूझा, ईसाक कुरेशी, प्रा. प्रकाश खळे, विशाल रणमाळे, राम सूर्यवंशी, कल्याणी आहिरे, सदाशिव गणगे, मंगेश निकम, कैवल्य चंद्रात्रे, प्राजक्ता कापडणे, उज्ज्वला मोगलाईकर, अन्वर पीरजादे, अनिसा सैफी, राजू शिरसाठ, निशिकांत पगारे, फारूख कुरेशी, वसंत ठाकूर, हीना शेख, सुफिया खान, इरफाना शेख, अमोल म्हरसाळे, प्रथमेश काळे आदी उपस्थित होते. मनोहर आहिरे यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT