भारत जोडो : पुन्हा जुळले आपुलकीचे अन् निष्ठेचे ऋणानुबंध! | पुढारी

भारत जोडो : पुन्हा जुळले आपुलकीचे अन् निष्ठेचे ऋणानुबंध!

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा हिंगोली येथे आली आहे. यावेळी तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी व पंचवीस वर्षांपूर्वी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष असणारे स्व. शंकरराव बाळा पाटील-कौलवकर यांच्या एकत्रित असणार्‍या फोटोवर सुशील पाटील-कौलवकर यांना राहुल गांधी यांनी हसतमुखाने सही दिली. यामुळे या जुन्या – नव्या ऋणानुबंधाच्या गाठी घट्ट झाल्या.

जि.प. चे माजी अध्यक्ष शंकरराव पाटील-कौलवकर यांचे सुशील हे चिरंजीव आहेत. वडिलांचा निष्ठेचा राजकीय वारसा ते पुढे चालवत आहेत. नांदेड येथे भारत जोडो यात्रेमध्ये त्यांनी सहभाग घेतला. यावेळी आपल्या वडिलांचा आणि राजीव गांधी यांचा एकत्रित फोटो घेऊन ते राहुल गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते.

यावेळी गांधी यांनी सुशील यांच्याशी हस्तांदोलन करत लॅमिनेट फोटोवर स्वाक्षरी केली. याप्रसंगी आ. सतेज पाटील, आ. विश्वजित कदम, आ. ऋतुराज पाटील, राहुल पाटील, बाजीराव खाडे आदी उपस्थित होते.

Back to top button