उत्तर महाराष्ट्र

शॉट सर्किटमुळे आग : शिरपूर येथे ३० एकरातील ऊस जळून खाक

अविनाश सुतार

धुळे, पुढारी वृत्तसेवा : शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील मुख्य विद्युत वाहिनीच्या लोंबकळणाऱ्या तारांमुळे शॉट सर्किटमुळे आग लागली. या दुर्घटनेत ३० एकर शेतातील ऊस  जळून खाक झाला. तरुणांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे ७ एकरातील ऊस वाचविण्यात यश आले. शेतातील अग्नितांडव पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते.

शॉट सर्किटमुळे आग : तब्बल ३० एकर ऊस आगीत भस्‍मसात

थाळनेर येथील चुनीलाल जमादार यांच्या उसाच्या शेतातून महावितरणची ११ केव्हीची मुख्य विद्युत वाहिनी गेली आहे. या वाहिनीवरून धोकादायकरित्या विद्युत तारा खाली लोंबकाळत होत्या. याबाबत शेतकऱ्यांनी महावितरण विभागाला तोंडी कळवले होते. त्यानुसार महावितरणचे कर्मचारी या ठिकाणी पाहणी करून गेले होते. मात्र, पुढील कार्यवाही केली नव्हती. त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे शेतातील उसाला आग लागून तब्बल ३० एकरातील ऊस जळून खाक झाला.

या दुर्घटनेत शेतकरी चुनीलाल जमादार, भोजुसिंग भिमसिंग जमादार, मोहन सिंग सरदारसिंग गिरासे, रवींद्र मगन सिंग जमादार यांचे मोठे नुकसान झाले आहे. जमादार पाडा येथील तरुणांनी प्रसंगावधान राखत वेळीच मदतकार्य केल्यामुळे पुढील ८ ते १० एकर ऊस (sugar Cane)  वाचविण्यात यश आले. यावेळी तेजस जमादार, करतार जमादार, हरपाल जमादार, प्रवीण जमादार, प्रदीप राउळ, भागवत तेले, दीपक जमादार, कुलदीप जमादार आदींनी मदत केली. शिरपूर अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. एपीआय उमेश बोरसे यांनी शेतात येऊन पाहणी केल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT