जळगाव; पुढारी वृत्तसेवा: शेतात पाडलेले प्लॉट एन. ए. करण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणार्या भुसावळ प्रांत कार्यालयातील महिला लिपिकास ताब्यात घेण्यात आले. नंदूरबार लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे भुसावळ प्रांत कार्यालयासह परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतिभा मच्छिंद्र लोहार (वय ४०) असे १० हजारांची लाच मागणाऱ्या महिला लिपिक हिचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका व्यक्तीने (तक्रारदार) प्लॉट एन. ए. करण्यासाठी भुसावळ प्रांत कार्यालयात कागदपत्रे सादर केली होते. यानंतर त्याच्या कामात अडथला येत होता.
यानंतर महिला लिपिका प्रतिभा मच्छिंद्र लोहार यांनी कामाच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती.
दरम्यान, तक्रारदार यांनी नंदूरबार लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, १७ सप्टेंबर २०२१ रोजी सापळा रचला असताना लोहार यांना संशय आला. त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारली नाही. परंतू, लाच मागितल्याचे सिध्द झाले होते.
यानंतर प्रतिभा मच्छिंद्र लोहार या महिला लिपिक हिला आज मंगळवारी (दि. ५) रोजी नंदूरबार पथकाने ताब्यात घेतले. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई नंदुरबार एसीबीच्या निरीक्षक माधवी वाघ व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे.
पाहा व्हिडिओ : भेटरूपी ऐतिहासिक शस्त्र बनवतात पुण्यातील सत्यजीत वैद्य |