उत्तर महाराष्ट्र

आणखी चार पेनड्राईव्ह देणार

Shambhuraj Pachindre

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या पेनड्राईव्हमध्ये सत्यता असून, महाविकास आघाडी सरकारने त्यावर खुलासा केल्यावर आणखी एक-दोन नव्हे, तर तब्बल चार पेनड्राईव्ह देऊ, असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी दिला. माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या कन्येच्या विवाहानिमित्ताने दानवे येथे आले होते.

माध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला. फडणवीस यांनी दिलेल्या पेनड्राईव्हमध्ये सत्यता नव्हती; तर सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा का घेतला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.एमआयएम हा महाविकास आघाडीसोबत आला किंवा नाही,

त्याच्याशी आम्हाला देणेघेणे नसून आमचा मुद्दा हा शिवसेनेपुरता आहे. शिवसेनेने भाजपशी दगाफटका करीत भगवा सोडून हिरव्याला प्राधान्य दिले, तेव्हापासून सेनेचे हिंदुत्व फिके पडले. मविआ सरकारमधील काही आमदारांकडून नाराजीचा सूर एक दिवस आळवला जाणारच होता. राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे आपले चांगले मित्र असून, त्यामुळे त्यांच्यावर टीकाटिप्पणी करणार नसल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT