उत्तर महाराष्ट्र

जळगाव : वाहतूक कोंडीत अडकली रुग्णवाहिका

backup backup

जळगाव; पुढारी वृत्तसेवा

जळगाव किंवा मुंबईला जा-येण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पुल म्हणजे बाभोरीचा आहे. मात्र या पुलावर वाहतुकीच्या कोंडीमुळे ये-जा करण्यासाठी नागरिकांना दोन ते तीन तास अवधी लागत आहे.

आज सकाळी या रस्त्यावर ट्रॅक्टरचे चाक निघाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. तर दुपारी एका कंटेनरमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती.

परिणामी एका रुग्णाला मुंबईला घेऊन जाणारी रुग्ण वाहिका अडकली होती. (Ambulance in traffic) तरीही या रूग्णवाहिकेला वाट मोकळी करून देण्यासाठी बराच वेळ कोणी पुढे सरसावले नाही.

यामुळे रूग्णाच्या जीवाचे गांभीर्य कोणाला दिसून आले नाही.

जळगावात येण्यासाठी किंवा मुंबईला जाण्यासाठी वाहनधारकांना व नागरिकांना एकमेव पर्याय म्हणजे गिरणा नदीवर असलेला बाभुरी पूल आहे. (Ambulance in traffic)

आज या पुलावर सकाळी ट्रॅक्टरचे चाक निघाल्याने दुपारपर्यंत ट्राफिक जाम होते. काही वेळानंतर वाहतूक सुरळीत झाली होती तोपर्यंतच एक कंटेनर नादुरूस्त झाला आणि पुन्हा वाहतूक ठप्प झाली.

ही वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी बराच वेळी या ठिकाणी कोणताही वाहतूक पोलीस किंवा पोलिस कर्मचारी दिसून आला नाही.

परिणामी वाहतूक सुरळीत होण्याची वाट न बघता रूग्णवाहिका दुसऱ्या मार्गाने मुंबई ला रवाना झाली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT