जळगाव : पुढारी वृत्तसेवा : फैजपूर येथे भुसावळ येथील एका युवकाला गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी डीआयजी व डी. वाय एस. पी यांच्या पथकाने अटक केली आहे. या प्रकरणी फैजपुर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या युवकाकडून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, मोटरसायकल सह आरोपी यांना अटक करण्यात आली आहे.
डीआयजी व डी.वाय.एस.पी यांचे पथक स.पो.नि. सिध्देश्वर आखेगांवकर, सहायक फौजदार बशिर तडवी, हे. कॉ. रामचंद्र बोरसे, पोलिस नाईक मनोज दुसाने, राजेश ब-हाटे, पोलिस नाईक किरण चाटे, चेतन महाजन, उमेश सानप यांनी केलेल्या कारवाईत भुसावळ येथील गंगाराम प्लॉट, मुन्सिपल हायस्कूल मागे राहणारा विशाल प्रकाश पाचपांडे (वय 23 वर्ष) याच्याजवळ 25 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, एक हजार रुपये किमतीचा एक राउंड, 30 हजार रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल असा एकुण 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याने उमर्टी ता. वरला जि. बडवाणी (मध्यप्रदेश) येथील शिकलकर नामक तरुणाकडून कट्टा घेतला होता. या प्रकरणी फैजपूर पोलिस स्टेशनला आर्म अँक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अटकेतील आरोपीस फैजपूर पोलिसांच्या ताब्यात पुढील कारवाई कामी देण्यात आले आहे.
दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.