Shrirampur Toxic Powder Pudhari
अहिल्यानगर

Shrirampur Toxic Powder: श्रीरामपूरमध्ये विषारी पावडर फवारणी; पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू

मसाले गल्लीतील स्वच्छता कर्मचार्‍यांना मळमळ व चक्कर; तातडीने रुग्णालयात दाखल, आरोग्य कर्मचारी सुरक्षितता चौकशीखाली

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर: बेलापूररोड परिसरातील बजरंगनगरनजीक मसाले गल्लीत विषारी औषध फवारत असताना श्रीरामपूर पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना अचानक मळमळ व चक्कर आली. तातडीने त्यांना श्रीरामपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे समजते. सुनील बागडे (वय 50), चंद्रकांत दळवी, (वय 56), गोकुळ मारसाळे (वय 34), अरुण अस्वले (वय 35) असे उपचार सुरू असलेल्या चार कामगारांची नावे आहेत.

श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 7 मधील बेलापूर रोड परिसरातील बजरंगनगर आहे. तेथील मसाले गल्ली भागात हे स्वच्छता कर्मचारी जंतू मारण्यासाठी हातानेच विषारी पावडर मारत होते. पावडर मारतेवेळी वासाने भोवळ व नंतर मळमळ होऊ लागल्याने मुकादम व नागरिकांनी चौघा कामगारांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल केले.

ज्या ठेकेदाराकडे हे कर्मचारी आहेत ते पालिकेचे अधिकृत कर्मचारी की कंत्राटी हे मात्र समजू शकले नाही. दरम्यान, पालिकेच्या स्वच्छ विभागात काम करणारे 4 कर्मचारी मळमळ होऊ लागल्याने व चक्कर येऊ लागल्याने तसेच त्यांना त्रास होत असल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे साखर कामगार रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आरोग्य कर्मचाऱ्यांबाबत झालेल्या प्रकाराची चौकशी सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. यात कोणी दोषी असेल तर कारवाई केली जाईल.
करण ससाणे, नगराध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT