Shrirampur Sonam Wangchuk Protest Pudhari
अहिल्यानगर

Shrirampur Sonam Wangchuk Protest: सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ श्रीरामपूरात निदर्शने; केंद्र सरकारविरोधात माले लिबरेशनचा एल्गार

जंतर-मंतरवरील आंदोलकांवरील कारवाईचा निषेध; पेपरफुटीची न्यायिक चौकशी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्या

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर: दिल्ली येथील जंतर-मंतरवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक, विद्यार्थी नेत्या नेहा बोरा आणि इतर आंदोलकांवरील दडपशाहीच्या निषेधार्थ भारताचा कम्युनिस्ट पक्ष (माले) लिबरेशनच्या वतीने काल सोमवारी (दि. २०) महात्मा गांधी स्मारकाजवळ जोरदार निदर्शने करण्यात आली.

यावेळी आंदोलकांनी विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. निदर्शनानंतर आंदोलकांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविले. हे निवेदन श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विशाल खैरे यांच्यामार्फत पाठविले.

निवेदनात सोनम वांगचुक, नेहा बोरा व इतर आंदोलकांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच नीट, यूजीसी-नेट, टीईटी, पोलिस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांची स्वतंत्र न्यायिक चौकशी करावी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, पेपरफुटीविरोधी कठोर कायदा करावा, लोकशाहीची गळचेपी थांबवा, शिक्षणाचे व्यापारीकरण थांबवावे आणि अशा मागण्याही केल्या.

यावेळी जीवन सुरुडे, राजेंद्र बावके, शरद संसारे, श्रीकृष्ण बडाख, संतोष मोकळ आणि मदिना शेख यांनी मनोगत व्यक्त करत केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. आंदोलकांवरील दडपशाही, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे होत असलेले दुर्लक्ष आणि शिक्षण क्षेत्रातील वाढत्या भ्रष्टाचाराचा त्यांनी निषेध केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT