Shrigonda Municipal Council Pudhari
अहिल्यानगर

Shrigonda Municipal Council: श्रीगोंदा नगरपरिषदेचा 221 कोटींचा महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्प मंजूर; शिवस्मारक, तीर्थक्षेत्र विकास व पायाभूत सुविधांना मोठी चालना

नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस यांच्या अध्यक्षतेखाली ऐतिहासिक निर्णय; सीसीटीव्ही, संविधान भवन, घरकुल व सौरऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य

पुढारी वृत्तसेवा

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 221 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्प आराखड्यास मंजुरी देण्यात आली. हा अर्थ संकल्प शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत प्रभावी आणि विधायक ठरणार आहे.

बैठकीत पारगाव रोड बायपास येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकासाठी 5 कोटी रुपयांची व महात्मा फुले सर्कल बायपास येथे 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यास एकमताने मान्यता दिली. श्री. संत शेख महंमद महाराज देवस्थानच्या विकासासाठी तीर्थशेत्र पर्यटन योजनेअंतर्गत रु. 10 कोटींची तरतूद करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. श्री. भैरवनाथ देवस्थान विकसित करण्यासाठी पर्यटनमध्ये तरतूद करण्यासाठी मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर अल्पसंख्यांक समाजाच्या विविध योजनांसाठी 5 टक्के राखीव निधीची तरतुद करण्यात आली. शहरातील विविध चौकात सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे, ऐतिहासिक वारसा असलेल्या महादजी शिंदे इमारत,

विजयचौक झेंडावेस आणि दिल्ली वेस यांचे संवर्धन व सुशोभीकरण करणे. शहरात संविधान भवन व बुद्धविहार उभारणे. मौलाना आझाद अल्पसंख्यांक निधी मर्यादा वाढवणे.इंदिरानगर, वेळू रोड सावित्रीबाई फुलेनगर , पेडगाव रोड सावंतवस्ती, सोनवणेनगर, गजानननगर येथील तसेच शहरातील विविध सरकारी जागेवरील लोकांना पक्के व हक्काचे घर देणे. याचबरोबर शहर स्वच्छता, सुरळीत पाणीपुरवठा दर्जेदार रस्ते, ओपन जिम, बगीचा सुशोभीकरण, दिव्यांग बांधवाना विशेष तरतूद , घरकुल योजना, दिवाबत्ती ,सौरऊर्जा प्रकल्प या सर्वच विषयांना मान्यता देण्यात आली.

बैठकीत उपनगराध्यक्ष अलका अनभुले यांच्यासह विविध बांधकाम समिती सभापती व नगरसेवकांनी सुचविलेल्या रस्ते, ड्रेनेज, शाळा परिसर सुशोभीकरण आणि सामाजिक प्रश्न या सर्व मागण्यांना प्रधान्याने मंजुरी देण्यात आली. या प्रशासनाच्या वतीने पुष्पगंधा भगत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लेखापाल नन्नवरे यांनी आपल्या कारकीर्दीतील पहिल्याच अर्थसंकल्पात शहराच्या या महत्त्वाकांक्षी गरजा अतिशय प्रभावीपणे मांडल्या. या विकासक्षम अर्थसंकल्पातुन श्रीगोंदा शहराच्या प्रगतीची नवी दिशा निश्चित होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT