knife attack Pudhari
अहिल्यानगर

Shevgaon Crime News: भाजप तालुकाध्यक्षास मारहाण; चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

आंबेडकर चौकात काळ्या थारमधून आलेल्या टोळक्याचे कृत्य; दोन तोळ्यांची चेन आणि २२ हजार ४०० रुपये लंपास

पुढारी वृत्तसेवा

शेवगाव: भाजपचे तालुकाध्यक्ष संजय रामनाथ टाकळकर यांना शहरातील आंबेडकर चौकात अडवून मारहाण करीत त्यांच्याकडील सोन्याची चेन व रोख रक्कम लुटल्याची घटना १९ नोव्हेंबरच्या रात्री साडेअकरा वाजता घडली.

काळ्या रंगाच्या थार गाडीतून आलेल्या सलमान इनामदार याच्यासह साथीदारांनी टाकळकर यांना गाडीतून खाली ओढून मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या घटनेत दोन तोळ्यांची सोन्याची चेन आणि २२ हजार ४०० रुपये रोख रक्कम लंपास झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

याबाबत संजय रामनाथ टाकळकर ( रा. घोटण, ता. शेवगाव) यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सलमान इनामदार, अरबाज इनामदार (दोघांचे पूर्ण नाव माहीत) आणि सहा अनोळखी साथीदारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, १९ रोजी रात्री साडेआठ वाजता टाकळकर हे मित्र रामभाऊ बोडखे यांच्याकडे गेले होते. काम आटोपून ते रात्री साडेअकरा वाजता (एमएच १६ बीझेड ०५४०) या क्रमांकाच्या कारने आंबेडकर चौकातून घोटणकडे जात होते.

यावेळी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने त्यांनी कार थांबवली. रस्त्यावरील विजेचे खांब काढण्याचे काम सुरू असताना एक खांब रस्त्यावर पडला. त्यामुळे टाकळकर यांनी संबंधित कामगारांना काम काळजीपूर्वक करण्यास सांगितले.

याचवेळी काळ्या रंगाची थार (एमएच १६ ६४६४) गाडी समोर येऊन थांबली. या गाडीतील सलमान इनामदार याने गाडी रस्त्यात का उभी केली, असे म्हणत टाकळकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

टाकळकर यांनी शिवीगाळ करण्याचे कारण विचारल्याने वाद वाढला. त्यानंतर सलमान याने फोन करून पाच ते सहा साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सलमान इनामदार याने टाकळकर यांची गचांडी धरून त्यांना गाडीतून खाली ओढले.

त्यानंतर सलमान व त्याच्या साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली. यावेळी सलमान याने चाक काढून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी सलमान इनामदार, अरबाज इनामदार रा शेवगाव व त्यांचे सहा अनोळखी साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार अजिनाथ विश्वनाथ बढे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT