शेवगाव: तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींची मुदत संपूनही निवडणुका जाहीर झाल्या नाहीत. आता प्रशासकांच्या हात गाव कारभार देण्यात आला आहे. डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत पहिल्या टप्प्यात मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतींच्या निवडणुका तातडीने होणे अपेक्षित होते. मात्र, निवडणुका रखडल्याने ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प होऊ नये, म्हणून प्रशासकीय कारभार सुरळीत सुरू राहावा, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी प्रशासक नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत.
या निर्णयामुळे गावपातळीवरील सत्तेची सूत्रे लोकप्रतिनिधींकडून अधिकाऱ्यांकडे गेली आहेत. निवडणुका कधी होणार, ग्रामपंचायतींना पुन्हा लोकनियुक्त कारभारी कधी मिळणार, असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
या ग्रामपंचायतींवर प्रशासक भातकुडगाव, कांबी, निंबेनांदूर, गायकवाड जळगाव : विस्तार अधिकारी महादेव भोसले, सोनेसांगवी, शिंगोरी, अंतरवली खुर्द : विस्तार अधिकारी गौतम फाजगे. आव्हाने खुर्द, सुलतानपूर बुद्रुक, चेडेचांदगाव, ठाकूरपिंपळगाव :विस्तार अधिकारी दिगंबर भांड, भविनीनिमगाव, हसनापूर, ढोरजळगाव-ने, ढोरजळगाव-शे : विस्तार अधिकारी दादासाहेब शेळके. अंतरवली बुद्रुक, नवीन दहिफळ, आखाडवाडे : कनिष्ठ अभियंता निलेश झिरपे. मळेगाव-शे, लखमापुरी, चापडगावः विस्तार अधिकारी सचिन भाकरे. घोटण, जुने दहिफळ, नजीक बाभुळगाव, तळणी : सुजित भोंग. दहिगाव-शे, नागलवाडी, कोणोशी : शाखा अभियंता महेश नेहुल.
मजलेशहर, बक्तरपूर, बेलगाव : शाखा अभियंता प्रशांत भिसे, कोळगाव, पिंगेवाडी : शाखा अभियंता राम राजळे. गदेवाडी, सोनविहीर, हातगाव :कनिष्ठ अभियंता अभिमन्यू वावरे. खुंटेफळ, राक्षी : विस्तार अधिकारी शैलजा राऊळ, शेकटे बुद्रुक, सुकळी, राणेगाव : स्थानिक अभियंता, ताजनापूर. बोडखे :अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती गोरे.दादेगाव : अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती आहेर, अधोडी : अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती बडे. वरखेड, वाडगाव : विस्तार अधिकारी शंकर गाडेकर.
दरम्यान, मुदत संपलेल्या सर्वच्या सर्व ४८ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती कार्यालयातून देण्यात आली आहे. निवडणुका लांबल्या, लोकप्रतिनिधी गेले आणि आता ४८ गावांचा कारभार अधिकाऱ्यांच्या हाती! त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुका नेमक्या कधी होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.