Shani Shingnapur Prasadalaya Pudhari
अहिल्यानगर

Shani Shingnapur Prasadalaya: शनिशिंगणापूरचे 'प्रसादालय' आजपासून पुन्हा सेवेत

काम पूर्ण झाले असून प्रसादालय भक्तांसाठी खुले होत आहे, अशी माहिती देवस्थान प्रशासनाने पत्रकाद्वारे दिली.

पुढारी वृत्तसेवा

सोनई: शनिशिंगणापूर येथील श्री शनेश्वर देवस्थानचे 'प्रसादालय' नूतनीकरण व अत्याधुनिक बदलांनंतर बुधवारी म्हणजे १ जुलै रोजी पुन्हा भाविकांच्या सेवेत रुजू होत आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये हे प्रसादालय नूतनीकरणाच्या कामासाठी तात्पुरते बंद करण्यात आले होते. हे काम पूर्ण झाले असून प्रसादालय भक्तांसाठी खुले होत आहे, अशी माहिती देवस्थान प्रशासनाने पत्रकाद्वारे दिली.

ऑस्ट्रेलियातील किशोर माटा यांच्या १.७५ कोटी रुपयांच्या देणगीतून स्वयंपाकघराचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. प्रशासक तथा नाशिक विभागीय आयुक्तांच्या निर्देशाने या प्रसादालयामध्ये उत्तम दर्जाचे भोजन तयार करण्यासाठी 'सेवा पुरवठादाराची' नियुक्ती रीतसर ई-निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात आली. सोबतच प्रसादालयासाठी लागणारी इतर सर्व आवश्यक साहित्य खरेदीसुद्धा निविदा/दरपत्रक प्रक्रिया राबवून पूर्ण करण्यात आली आहे.

प्रसादालयाची वैशिष्ट्ये

अत्याधुनिक व स्वयंचलित यंत्रसामग्री : १.७५ कोटींच्या साहित्यातून स्वयंपाकघराचे पूर्णपणे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. अन्न शिजवण्यापासून ते पूर्ण स्वच्छता (Hygiene) राखण्यापर्यंतच्या मुख्य बाबी आता अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रांद्वारे केल्या जातील, ज्यामुळे प्रसादाची शुद्धता आणि गुणवत्ता टिकून राहील.

भक्तांचे १.७५ कोटींचे मोलाचे योगदान : या प्रसादालयाच्या आधुनिकीकरणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे किशोर माटा (ऑस्ट्रेलिया) यांनी यासाठी तब्बल १.७५ कोटी रुपयांचे आधुनिक साहित्य व यंत्रसामग्री देणगी स्वरूपात दिली आहे. त्यांच्या या दातृत्वातून प्रसादालयाचे स्वयंपाकघर उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात आले आहे.

पारदर्शकता आणि गुणवत्ता : ई-निविदेद्वारे नियुक्त सेवा पुरवठादार आणि दर्जेदार साहित्य खरेदीमुळे भाविकांना दिल्या जाणाऱ्या भोजनाचा दर्जा उत्तम राहील याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT