Ahilyanagar Road Issue: दिल्लीगेट दुभाजकावरील अपघातांना आळा; उपमहापौर धनंजय जाधवांच्या हस्तक्षेपानंतर तातडीने रिफ्लेक्टर बसवले

वाहनधारकांच्या तक्रारींची दखल; पाहणीनंतर काही तासांत प्रशासनाची कारवाई, रात्रीची सुरक्षितता वाढणार
Ahilyanagar Road Issue
Ahilyanagar Road IssuePudhari
Published on
Updated on

नगर: दिल्लीगेट परिसरातील रस्त्यावरील डिव्हायडर (दुभाजक) गेल्या काही दिवसांपासून वाहनधारकांसाठी मोठा अपघात प्रवण क्षेत्र बनला होता. रात्रीच्या वेळी किंवा अंधारात हा डिव्हायडर नीट दिसत नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाहने धडकून छोटे-मोठे अपघात होत होते.

Ahilyanagar Road Issue
Ahilyanagar Voter List Revision: अहिल्यानगरमध्ये आजपासून मतदारयादी विशेष पुनरीक्षण; गणना प्रपत्र भरल्याशिवाय नव्या यादीत नाव नाही

यामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण होते. या समस्येची गंभीर दखल घेत आज उपमहापौर धनंजय जाधव यांनी दिल्लीगेट परिसराला भेट देऊन या धोकादायक डिव्हायडरची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर अवघ्या काही तासांत प्रशासनाने डिव्हायडरवर रिफ्लेक्टर बसविले.

Ahilyanagar Road Issue
Ahilyanagar Police Ganja Crackdown: अहिल्यानगर पोलिसांचे मेगा ऑपरेशन; सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढताना 65 जण रंगेहाथ ताब्यात

दिल्लीगेट परिसरातील रस्त्यावरील डिव्हायडर (दुभाजक) गेल्या काही दिवसांपासून वाहनधारकांसाठी अपघाताला आमंत्रण देत होता. दरारोज छोटे मोठे अपघात होत होते. नागरिकांच्या वारंवार तक्रारी आल्याने उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांनी आज सकाळी प्रत्यक्ष दिल्लीगेट येथे जावून दुभाजकाची पाहणी केली.

Ahilyanagar Road Issue
Ahilyanagar Dam Water Storage: अहिल्यानगरमध्ये धरणांचा पाणीसाठा 23% वर; पावसाअभावी दुष्काळाची भीती, 3 जुलैपर्यंत येलो अलर्ट

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपमहापौर जाधव यांनी जागेवरून संबंधित महापालिका अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना दिल्या व तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. उपमहापौरांच्या सूचनेनंतर महापालिका प्रशासान तातडीने कामाला लागले.

Ahilyanagar Road Issue
Uddhav Thackeray Shirdi Rally: शिर्डीत उद्धव ठाकरेंचा वाकचौरेंवर घणाघात; 'खाऊसाहेब' म्हणत टीका, तर 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

आदेश मिळाल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आतच या धोकादायक डिव्हायडरच्या सुरुवातीला एक मजबूत पोल उभारून त्यावर चमकणारे रिफ्लेक्टर बसवण्यात आले. या रिफ्लेक्टरमुळे आता रात्रीच्या वेळी दूरवरून येणाऱ्या वाहनधारकांनाही डिव्हायडर स्पष्टपणे दिसणार असून, यामुळे होणारे अपघात पूर्णपणे टळणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news