Sangamner Traffic Congestion Pudhari
अहिल्यानगर

Sangamner Traffic Congestion: संगमनेरातील वाहतूक कोंडीने नागरिक हैराण; सिग्नल असूनही बेशिस्त वाहतुकीला लगाम नाही

अकोले नाका, तीनबत्ती, दिल्ली नाका परिसरात कोंडी नित्याची; रिक्षा, पार्किंग आणि अतिक्रमणामुळे समस्या गंभीर

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: शहरातील सर्वच मुख्य चौकात वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. नागरिक सिग्नलकडे दुर्लक्ष करत असल्याने वाहतूक कोंडी नित्याची समस्या बनली असून वाहतूक समस्येतून कधी सुटका होणार असा सवाल नागरिक करत आहे.

संगमनेरातील गेल्या अनेक वर्षापासून बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. याला यश न आल्याने अखेर शहरातील सर्वच मुख्य चौकात नगरपालिकेच्या वतीने सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली. दिल्ली नाका, अकोले नाका, बसस्थानक परिसर असलेल्या काही मुख्य चौकांमध्ये नगरपालिकेच्या वतीने स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली.

मात्र घुलेवाडीकडे जाणाऱ्या रिक्षा स्टँडमुळे वाहतुकीची कायम कोंडी होत असून बेशिस्त रिक्षाचालक रस्त्याच्या दोन्ही बाजूने रिक्षा उभ्या करतात. यामुळे अकोले रस्त्याकडे वळणाऱ्या बसेस नवीन नगररोडकडे वळणारी वाहनामुळे दिवसभर या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. यातच बस स्थानक परिसरात असलेल्या व्यापारी संकुलासमोर मोकळ्या जागेत चारचाकी वाहने दिवसभर पार्कीग करून ठेवतात. बस स्थानक परिसरात जाणाऱ्या एसटी बसेसला वळतांना तारेवरची कसरत करावी लागते.

शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिस नसल्याने नेहमीच नागरिक सिग्नलकडे दुर्लक्ष करतात. यातच टार्गट तरुण चालू भरधाव वेगाने दुचाकीवरुन स्टंट करतात. रिक्षा चालकांची दादागिरीमुळे अनेकदा अपघात होवून निरपराध नागरिकांना त्रास होतो. अकोले नाका, तीन बत्ती चौक, दिल्ली नाका परिसरात होणारी वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे.

यातच सध्या गणेशोत्सव असल्याने समस्या अधिकच गंभीर बनली आहे. तर अनेक मोठ्या शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर पार्किंगचे व्यवस्था नसल्याने रस्त्यावरच वाहने लावली जातात. शहरातील १३२ केव्ही ते दिल्ली नाका जोर्वे नाका परिसरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून फुटपाथवर फेरीवाले ठाण मांडून बसले आहे. बेशिस्त वाहतुकीला आळा घालतांना पोलिस, नगरपालिका, स्थानिक प्रशासन त्रस्त झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT