Sangamner Power Cut Protest Pudhari
अहिल्यानगर

Sangamner Power Cut Protest: संगमनेरमध्ये वीज खंडितीवर शेतकऱ्यांचा संताप; रास्ता रोको आंदोलन

महावितरणविरोधात मोर्चा; 11 तास वीज पुरवठ्याची मागणी, आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: सध्या उन्हाची तिव्रता प्रचंड वाढलेली आहे. परिणामी, वारंवार खंडित होणाऱ्या विज पुरवठ्यामुळे संतत्त शेतकाऱ्यांनी महावितरणच्या धांदरफळ खुर्द परिसरातील कार्यालयावर काल बुधवारी (दि.15) मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून धांदरफळ बुद्रूक, धांदरफळ खुर्द, सांगवी, नांदुरी दुमाला, निमज, मिर्झापूर यांसह परिसरातील गावांमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. यातच उन्हाचे दिवस असल्याने शेतीसाठी कमी दाबाने वीज उपलब्ध होते. या विरोधात ग्रामस्थ व शेतकरी आक्रमक झाले होते. या आंदोलनात कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले, माजी जि. प. सदस्य रामहरी कातोरे, डॉ. माधवराव कानवडे, संपतराव डोंगरे, दत्ता कोकणे, शरद कोकणे, मारुती कवडे, सतीश खताळ, शुभम घुले, संगम आहेर, शांताराम गोरडे, देविदास खताळ, सुरेश कातोरे, अण्णा खताळ, भाऊराव शिरतार, अविनाश खताळ, किशोर खताळ, राजेंद्र बोडके, सरपंच लताताई खताळ, सरपंच नवनाथ कातोरे उपस्थित होते.

वीज पुरवठा सुरळीत करण्याबरोबर लवादाच्या निर्णयानुसार रोटेशनच्या कालावधीमध्ये 11 तास वीज मिळावी, यासाठी सुमारे चार तास भर उन्हामध्ये रास्ता रोको करण्यात आला. अकरा तास वीज मिळाली नाही तर गुराढोरांसह मोठे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

सध्या सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढत असून शेतीसह पशुधनासाठी पाणी मिळण्याकरीता वीज पुरवठा सुरळीत झाला पाहिजे. मात्र महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे वीज वारंवार खंडित होत आहे. यामुळे धांदरफळ परिसरातील विविध गावांमध्ये शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. यावेळी शुभम घुले, संगम आहेर, शांताराम गोरडे, देविदास खताळ, सुरेश कातोरे, अण्णा खताळ, भाऊराव शिरतार, अविनाश खताळ, किशोर खताळ, राजेंद्र बोडके, रामहरी कातोरे, पांडुरंग घुले, दत्ता कोकणे, संपतराव डोंगरे, अरुण गुंजाळ, शरद कोकणे, अरुण गुंजाळ आदी उपस्थित होते.

बंद रोहित्र सुरळीत करा

सलग 11 तास विज पुरवठा मिळावा. जुने जीर्ण झालेले पोल आणि विद्युत तार यांचे व्यवस्थापन करावे. नदीच्या कडेला बंद असलेले रोहित्र सुरळीत सुरू करावे. अकोले वरून येणारी 33 के. व्ही. धांदरफळ फिडरचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा. शेतीसाठी कमी दाबाने विज पुरवठा झाल्यास तो भरून काढावा, अशा विविध मागण्या शेतकऱ्यांनी यावेळी केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT