Rajendra Gadge Pudhari
अहिल्यानगर

Sangamner Fake Baba Case: संगमनेरमध्ये भोंदू गडगे महाराज पोलिस कोठडीत; आश्रम सील

आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू; दत्तधाम आश्रमावर पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: तालुक्यातील वडगावपान येथे दत्तधाम नावाने आश्रम चालवणाऱ्या भोंदू गडगे महाराज याला न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली. यामुळे भोंदू गडगेची रवानगी कारागृहात करण्यात आली. आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जाणार आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास करत रविवारी दत्त धामची पाहणी केली असून तो सिल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण सांळुखे यांनी दिली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सचिव ॲड रंजना गवांदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात भोंदू राजेंद्र गडगे महाराजासह ज्ञानेश्वरी गडगे, डॉ. मोहन पुरी, सूरज शिंदे व मधुकर शिंदे अशा पाच जणांविरुद्ध शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

यात भोंदू महाराजासह मधुकर शिंदे या दोघांना अटक केली. तर इतर तिघे फरार झाले आहेत. पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा आश्रमातील कागदपत्रांची तसेच वस्तूंची तपासणी केली. काही महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली असून ती जप्त करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहाराची तपासणी केली जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी वडगाव पान येथील गडगे महाराजाच्या आश्रमाची रविवारी (दि.19) पाहणी केली. तसेच तेथील नागरिकांकडून माहिती घेतली. दिवसभर पोलिसांनी आश्रमाची पाहणी करून ते सील केले. आश्रमातील खोल्यांची पाहणी केली.

कागदपत्रे तपासली, आर्थिक व्यवहारांची माहिती घेतली. गडगे महाराजाकडून अनेक भक्तांकडून देणग्या गोळा करण्यात आल्या. यात आणखी काही माहिती उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सायंकाळच्या सुमारास हा आश्रम पोलिसांनी सिल केला. यामुळे भोंदू गडगे महाराजाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT