संगमनेर : साकुर पठार भागातील वाडी-वस्त्यांवर अजूनही रस्ते,पाणी, व आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांपासून जाणून-बुजून वंचित ठेवले. महायुतीच्या पाठीमागे उभे रहा, तालुक्यातील कुठलेही गाव विकासापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी यांनी व्यक्त केला. साकुर पठार भागात अनेक जण दहशत, दादागिरी करत जनतेला त्रास देण्याचे काम करत आहे .त्यांचाही लवकरच बंदोबस्त केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. (Latest Ahilyanagar News)
संगमनेर तालुक्याच्या साकुर पठार भागातील हिवरगाव पठार अंतर्गत येत असणाऱ्या सुतारवाडी पायरवाडी गि-हे वाडी शेंडेवाडी अंतर्गत सतीचीवाडी गुंजाळवाडी पठार मांडवे शिंदोडी बिरे वाडी व जांबुत येथील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बाबासाहेब कुटे, बुवाजी खेमनर, गुलाब भोसले, ऱौफभाई शेख, इसाक पटेल, सुभाष पेंडभाजे, रवींद्र दातीर, सुभाष भुजबळ, अमृता कोळपकर, अमित धुळगंड, संदीप खिलारी, शेंडेवाडी सरपंच कमल गावडे उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, शासनाच्या सर्व योजनांचा लाभ खऱ्या आदिवासी बांधवांना मिळाला पाहिजे. भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांना शालेय दाखले, तसेच रेशनकार्ड, आणि शासकीय, योजनांचा लाभ मिळून देण्यासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मदत करावी. तुमच्या वाडी वस्तीवरील विजेचे ट्रान्सफॉर्मर मंजूर करून वीज समस्या सोडवली जाईल. पुरंदर धरणातील गळती थांबवण्यासाठी जलसंपदा विभागाला सूचना देऊन गळती थांबवली जाईल.
यावेळी उपसरपंच भाऊ उगले, ज्ञानदेव वामन, गजानन खाडे, गोंदकेमामा, नितीन डोळझाके, कर्जुलेपठारचे सरपंच किरण भागवत, माजी सरपंच रवींद्र भोर, मारुती आगलावे, मांडवेचे उपसरपंच शब्बीर शेख,धोंडीभाऊ वाडेकर,बिरेवाडीचे माजी सरपंच बाबाजी सागर, शिंदोडीचे पाटीलबा कुदनर, विठ्ठल नाईकवाडी, संतोष शेटे,बाळासाहेब झिटे, राजेंद्र डोंगरे उपस्थित होते.