Ration Grain Black Market Pudhari
अहिल्यानगर

Ration Grain Black Market: राहुरीत १३ टन रेशनिंगचा गहू-तांदूळ जप्त; काळाबाजाराचा पर्दाफाश

सोनगाव सात्रळ येथे पोलिसांचा छापा; १२ लाखांचा धान्य व वाहनांसह मुद्देमाल हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

नगर/सोनगाव: काळ्या बाजारात जाण्याच्या तयारीत असलेला १२ हजार ८५० किलो म्हणजे सुमारे १३ टन रेशनिंगचा गहू व तांदूळ पोलसांनी उघडकीस आणला. सोनगाव सात्रळ शिवारात एका गोदामात छापा घालून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने शनिवारी या धान्यासह १२ लाख २ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी जणांना ताब्यात घेतले असून, राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनगाव सात्रळ (ता. राहुरी) शिवारात यासिर सादिक तांबोळी याने रेशनिंगचा गहू व तांदूळ विक्रीकरिता साई बालाजी फर्निचर शेजारी एका पत्र्याच्या गोदामात साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी यांना मिळाली.

त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलिस अंमलदार सुनील पवार, रिचर्ड गायकवाड, रमीजराजा अतार यांचे पथक तयार करून कारवाईसाठी रवाना केले.

पथकाने गोदामामध्ये छापा घालून यासिर सादिक तांबोळी (वय २६, रा. याला ताब्यात घेतले. त्याच्या समक्ष गोदामाची पाहणी केली असता गोदामामध्ये दोन वाहने व गोण्यांमध्ये भरलेले तांदूळ व गहू आढळला. चौकशीत यासीरने तो गहू व तांदूळ परिसरातील रेशनिंग दुकानामधून काळ्याबाजाराने खरेदी केल्याचे सांगितले.

२ लाख ९ हजार ७०० रुपयांच्या १२१ गोण्या गहू, २ लाख ९३ हजार रुपयांचा ११७ गोण्या तांदूळ तर, सात लाख रुपयांच्या दोन वाहने असा १२ लाख २ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT