कोपरगाव: आगामी स्थानिक स्वराज्यचे वारे वाहू लागलेले असतानाच, कोपरगावातही काळे-कोल्हे गटात हालचाली वाढताना दिसत आहे. तालुक्यातील तळेगाव मळे येथील काळे गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत जणू आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकल्याचे पहायला मिळाले.
लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीला कंटाळून कोल्हे कुटुंबावर विश्वास दाखवत प्रवेश झाले आहे. यावेळी मनोज काजळे, रामेश्वर काजळे, संजय टुपके, विष्णू शिंदे, कैलास टुपके, सुरेश जाधव, सोन्याबापू टुपके, दादासाहेब शेटे, ज्ञानदेव टुपके, रामनाथ साबळे, बंटी आभाळे, विलास शिंदे, रमेश गांगुर्डे, प्रकाश टुपके, रमेश टुपके, संजय टुपके, खुशालचंद आभाळे, शिवाजी जाधव आदीसह अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला आहे. कोल्हे यांनी सर्वांचे भारतीय जनता पार्टीमध्ये हार्दिक स्वागत केले. (Latest Ahilyanagar News)
याप्रसंगी कोल्हे कारखाना संचालक त्र्यंबकराव सरोदे, नारायणराव टुपके, दादा अप्पा टुपके, तुकाराम जाधव, वाल्मिकराव पिंपळे, साई संजीवनी बँकेचे संचालक सुरेश जाधव,वसंतराव कदम, धोत्रे सरपंच प्रदीप चव्हाण, किरण चव्हाण, भाऊसाहेब गागरे, मंजाहरी वैद्य, भाजपा पूर्व मंडल अध्यक्ष विशाल गोर्डे, युवा मोर्चा अध्यक्ष सतीश देवकर, गोरख पाटील, सरपंच दत्तात्रय टुपके, युवा मोर्चा शहराध्यक्ष सिद्धार्थ साठे, बाळासाहेब टुपके, ज्ञानदेव टुपके, आदी मान्यवर उपस्थित होते.
जनमताने उत्तर देण्याचा संकल्प अपेक्षित कामे होत नाही. केवळ सत्तेवर येण्यापर्यंतच आश्वासनांची खैरात झाली मात्र प्रत्यक्षात शेती आणि पिण्याच्या पाण्याचे प्रश्न बिकट होण्याला कारभारात नसलेलेली सुसूत्रता जबाबदार आहे. ग्रामीण भागातील जनतेचे दैनंदिन कामे होण्यास अडचण असून अधिकार्यांवर लोकप्रतिनिधींचा वचक नाही. येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेत या कारभाराला जनमताने उत्तर देऊ, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.