पाथर्डीत 55 गावांमध्ये महिला कारभारी; 53 गावांत मिळणार पुरुषांना मिळणार सरपंचपदाची संधी Pudhari
अहिल्यानगर

Pathardi News: पाथर्डीत 55 गावांमध्ये महिला कारभारी; 53 गावांत मिळणार पुरुषांना मिळणार सरपंचपदाची संधी

ऋषिकेश रवीकुमार सानप या चिमुकल्याच्या हस्ते चिठ्ठया काढण्यात आल्या.

पुढारी वृत्तसेवा

Pathardi sarpanch reservation

पाथर्डी: तालुक्यातील 108 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीत 55 ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज येणार असल्याचे गुरुवारी (दि. 24) स्पष्ट झाले. 53 ठिकाणी पुरुषांना सरपंचपदाची संधी मिळणार आहेत.

मागील वेळी काढलेल्या आरक्षणामध्ये फारसा बदल झाला नसला तरीही महत्वाच्या टाकळी मानूर, डांगेवाडी, खरवंडी कासार, कोल्हार, पाडळी, करंजी, भालगाव, एकनाथवाडी अकोले, चिचोंडी, जवखेडे खालसामध्येे महिलाराज अवतारणार आहे. तिसगावचे सरपंचपद खुल्या वर्गासाठी झाल्याने तेथे मोठी चुरस निर्माण होणार आहे. आमदार मोनिका राजळे यांच्या कासार पिंपळगावच्या सरपंचपद अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला मिळणार आहे. (Latest Ahilyanagar News)

तहसील कार्यालयात प्रांताधिकारी डॉ. प्रसाद मते, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, निवासी नायब तहसीलदार किशोर सानप, महसूल नायब तहसीलदार दिग्विजय पाटील, निवडणूक नायब तहसीलदार अप्पासाहेब शिंदे, दादासाहेब वावरे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. ऋषिकेश रवीकुमार सानप या चिमुकल्याच्या हस्ते चिठ्ठया काढण्यात आल्या.

ग्रामपंचायतनिहाय आरक्षण असेः अनुसूचित जाती महिला : मिडसांगवी, आल्हनवाडी, सोमठाणे खुर्द, घाटशिरस. अनुसूचित जाती व्यक्ती : कडगाव, मोहटे, शिरसाटवाडी, तोंडोळी. अनुसूचित जमाती महिला : अंबिकानगर. अनुसूचित जमाती व्यक्ती : कासार पिंपळगाव.

नागरिकांचा मागासवर्ग महिला : शंकरवाडी, अकोला, मोहोज खुर्द, देवराई, खांडगाव, राघोहिवरे, जवखेडे खालसा, मोहोज बुर्द, मांडवे, सातवड, मढी, चिचोंडी, भुतेटाकळी, हनुमान टाकळी, चितळी.

नागरीकांचा मागासवर्ग व्यक्ती : निपाणी जळगाव, बोरसेवाडी, सैदापूर, जोगेवाडी, वाळूज, मुंगूसवाडे, येळी, ढवळेवाडी, कोपरे, मोहरी, मोहोज देवढे, पारेवाडी, दुलेचांदगाव, कामत शिंगवे.

सर्वसाधारण महिला : टाकळीमानूर, आडगाव, आगसखांड, भालगाव, भारजवाडी, भिलवडे, चिंचपूर इजदे, चितळवाडी, डांगेवाडी, ढाकणवाडी, डोंगरवाडी, एकनाथवाडी, घुमटवाडी, गितेवाडी, जांभळी, करोडी, कौडगाव, खरवंडी कासार, कोल्हार, लांडकवाडी, मालेवाडी, निवडुंगे, पाडळी, पागोरी पिंपळगाव, पिंपळगाव टप्पा, रांजणी, रेणुकाईवाडी, शिराळ, शिरापूर, भोसे, तिनखडी, वडगाव, पत्र्याचा तांडा, पिंपळगव्हाण, करंजी.

सर्वसाधारण व्यक्ती : चुंभळी, औरंगपूर, दगडवाडी, डमाळवाडी, धामणगाव, धनगरवाडी, धारवाडी, हत्राळ, जवखेडे दुमाला, जवळवाडी, जिरेवाडी, कळसपिंप्री, कारेगाव, केळवंडी, खेर्डे, कोळसांगवी, कोरडगाव, लोहसर, माळी बाभूळगाव, माणिकदौंडी, मिरी, नांदूर निंबादैत्य, पिरेवाडी, साकेगाव, शेकटे, शिंगवे केशव, सोनोशी, सुसरे, वैजुबाभुळगाव, जाटदेवळे, चिंचपुर पांगुळ, सोमठाणे नलावडे, तिसगाव.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT