POCSO Pudhari
अहिल्यानगर

Parner Crine: पारनेरमध्ये अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपी अटकेत; पोलिसांची तातडीची कारवाई

तक्रार दाखल होताच काही तासांत आरोपीला अटक; बालसुरक्षा, जागरूकता आणि तक्रार नोंदविण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित

पुढारी वृत्तसेवा

पारनेर: माणुसकीला काळीमा फासवणारी घटना पारनेर तालुक्यात उघडकीस आली. गत 2 वर्षांपासून अल्पवयीन मुलीवर सातत्याने लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला फिर्याद दाखल होताच पारनेर पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली.

विठ्ठल मुरलीधर फरतारे (मुळ रा. मोहोज देवडे, पाथर्डी, सध्या रा.लोणी हवेली रोड, पारनेर) असे अटकेतील नराधामाचे नाव आहे. अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना विठ्ठल मुरलीधर फरतारे तिच्याशी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बळजबरीने शरीरसंबंध ठेवत होता. दोन वर्षापासून त्याचे हे कुकर्म सुरू होते. कोणाला सांगितल्यास भावाला व आईला मारून टाकण्याची तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी तो देत होता. अखेर घाबरलेल्या मुलीने आईला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर सोमवारी पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल करण्यात आली.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलूबर्म यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले.

तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपी फरतारे याला लोणी हवेली रोड परिसरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक चांदेव हंडाळ, हवालदार अमोल धामणे, कल्याण लांडगे, कॉन्स्टेबल गणेश डोंगरे, गोवर्धन जवरे, विशाल टकले राहुल गुंड अरुण सांगळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT